‘उचलेगिरी’ अडचणीत
By Admin | Published: July 15, 2016 12:44 AM2016-07-15T00:44:03+5:302016-07-15T01:11:51+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय ताळमेळाचा संयम अलीकडे संपला असून, मालमत्ताकर वसुलीसाठी वाट्टेल ते उपाय करून पालिका नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे.
औरंगाबाद : महापालिकेच्या प्रशासकीय आणि राजकीय ताळमेळाचा संयम अलीकडे संपला असून, मालमत्ताकर वसुलीसाठी वाट्टेल ते उपाय करून पालिका नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे. पोलिसांसमोर बड्या कर थकबाकीदारांना उभे करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता स्थावर ऐवजी जंगम मालमत्ता जप्त करण्याचा विचार पालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी सुरू केला आहे. मनपाच्या ‘घरगुती उचलेगिरी’ ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी कडाडून विरोध केला.
महापौर त्र्यंबक तुपे, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी याप्रकरणी पालिकेत एका बैठकीत अशा पद्धतीने कर वसुलीचा विचारही प्रशासनाने डोक्यात आणू नये, असा सल्ला प्रशासनाला दिला. मनपाची कर वसुली अडचणीत आली आहे. उपाययोजनेऐवजी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे.
घरगुती मालमत्ताधारकांनी सुमारे ८५ कोटी रुपयांची थकबाकी अनेक वर्षांपासून भरलेली नाही. जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांकडील टी. व्ही., दुचाकी वाहन, फ्रीज आदी मौल्यवान वस्तू जप्त करण्याची कारवाई मनपाकडून करण्याचा विचार सुरू आहे.
४२९० कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी कर अदालत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील १ लाख ३१ हजार नागरिकांनी गेल्या १० वर्षांत मालमत्ताकरापोटी एक रुपयाही मनपाकडे भरला नाही.
४चालू आर्थिक वर्षात मनपाने ३६८ कोटींच्या नोटिसा बजावल्या आहेत. प्रत्येक वॉर्डातील १०० मोठ्या थकबाकीदारांना कर अदालतीसाठी बोलावण्यात येणार आहे. निवासी मालमत्ताधारकांकडे जास्त कर थकीत असल्यामुळे त्यांना टार्गेट करण्यात येणार आहे.
४महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १२८ नुुसार घरातील ऐवज जप्त करण्याची तरतूद आहे. टी. व्ही., दुचाकी, कपाट, फ्रीज आदी मौल्यवान वस्तू जप्त करण्याचा अधिकार आहे, असा प्रशासनाचा दावा आहे. 1
१ लाख ३१ हजार मालमत्ताधारकांनी गेल्या १० वर्षांत करापोटी एक रुपयाही मनपात भरला नाही. अशा घरगुती थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा विचार पालिकेच्या डोक्यात आला कुठून, असा प्रश्न आहे. हा नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे.2
मनपा अधिनियमात कर वसुलीसाठी स्थावर मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. जंगम मालमत्ता जप्त करण्याची तरतूद ही सभागृहाच्या मान्यतेनुसार होऊ शकते. परंतु अशा पद्धतीने कर वसुली करणे योग्य नसल्याचे मत सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केले. दरम्यान, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या प्रकरणी टीकेचे लक्ष्य केले.