‘सिद्धार्थ’मध्ये उंटाची सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:12 AM2017-12-09T00:12:32+5:302017-12-09T00:50:41+5:30

उंटावर बसून चक्कर मारण्याची प्रथा शहरी भागात बरीच लोकप्रिय ठरत आहे. अनेक वसाहतींमध्ये उंटाचे मालक बच्चे कंपनीला उंटावर बसवून चक्कर मारतात. ही सेवा मनपाच्या सिद्धार्थ उद्यानात सुरू करण्यासाठी मागील काही दिवसांपासून सुरू होते.

 Uchachi Travel in 'Siddhartha' | ‘सिद्धार्थ’मध्ये उंटाची सफर

‘सिद्धार्थ’मध्ये उंटाची सफर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : उंटावर बसून चक्कर मारण्याची प्रथा शहरी भागात बरीच लोकप्रिय ठरत आहे. अनेक वसाहतींमध्ये उंटाचे मालक बच्चे कंपनीला उंटावर बसवून चक्कर मारतात. ही सेवा मनपाच्या सिद्धार्थ उद्यानात सुरू करण्यासाठी मागील काही दिवसांपासून सुरू होते. अखेर मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. सिद्धार्थ उद्यानात येणाºया बच्चे कंपनीच्या आनंदात यानिमित्ताने आणखी भर पडत आहे.
मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त ७ ते ९ डिसेंबरपर्यंत सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयात मोफत प्रवेश देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी २५ हजारांहून अधिक नागरिकांनी उद्यानास भेट दिली. दुसºया दिवशीही सिद्धार्थ उद्यान प्रचंड गजबजलेले होते. अनेक शालेय विद्यार्थ्यांनी याठिकाणी सहलीचे आयोजन केले होते. उद्या शेवटच्या दिवशीही गर्दी अफाट राहणार असल्याचे उद्यान अधीकक्ष विजय पाटील यांनी सांगितले. एवढी अलोट गर्दी सिद्धार्थमध्ये कधीच उसळली नव्हती, असेही त्यांनी नमूद केले.
सिद्धार्थ उद्यान बच्चे कंपनीसाठी आकर्षण केंद्र ठरत आहे. यानिमित्ताने उंटाची सफर आयोजित करण्यात आली आहे. खाजगी उंट पाळणाºयांना उद्यानात दिवसभर थांबण्यास सांगितले आहे. यासाठी मनपाने त्यांना दर निश्चित करून दिले आहेत. अत्यंत माफक दरात ते बच्चे कंपनीला उंटाची सफर घडवून आणत आहेत. या सेवेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेते विकास जैन आदींच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.

Web Title:  Uchachi Travel in 'Siddhartha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.