औरंगाबादहून २१ वर्षांनंतर उदयपूर विमानसेवेचे 'उड्डाण'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 08:22 AM2019-10-16T08:22:18+5:302019-10-16T08:25:43+5:30
विमानतळावर वॉटर सॅल्यूट देऊन स्वागत करण्यात आले.
औरंगाबाद : ऐतिहासिक पर्यटन शहर औरंगाबादेहून तब्बल २१ वर्षांनंतर, आजपासून उदयपूरसाठी विमानसेवा सुरु झाली. सकाळी ७.१५ वाजता विमानाने उदयपूरसाठी उड्डाण केले.
एअर इंडियाकडून मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी या विमानाने औरंगाबादहून अनेक प्रवासी उदयपूरला रवाना झाले.
या विमानसेवेचे चिकलठाणा विमानतळावर वॉटर सॅल्यूट देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, उद्योजक सुनीत कोठारी, ऋषी बागला, गिरीधर संगनेरिया , मानसिंग पवार, जसवंत सिंह राजपूत, एअर इंडियाचे सेल्स अधिकारी संतोष नायर, स्टेशन मॅनेजर अरुण गलाटे आदी उपस्थित होते.