उद्धव सेनेचे शहर प्रमुख विजय वाकचौरे यांच्या सहपदाधिकाऱ्यांचा शिंदे सेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 16:01 IST2024-10-13T16:00:59+5:302024-10-13T16:01:39+5:30
या प्रवेशाने शहर उद्धव सेनेत खळबळ उडाली आहे .आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश उद्धव सेनेसाठी धक्कादायक आहे.

उद्धव सेनेचे शहर प्रमुख विजय वाकचौरे यांच्या सहपदाधिकाऱ्यांचा शिंदे सेनेत प्रवेश
बापू सोळुंके/छत्रपती संभाजी नगर :उद्धव सेनेच्या पश्चिम विधानसभा शहर प्रमुख विजय वाकचौरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा शिंदे प्रवेश .आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे हे प्रवेश उद्धव सेनेसाठी धक्कादायक आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाकडून जोरात सुरू आहे. आता येत्या दोन दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे .या पार्श्वभूमीवर आता फोडाफोडीचे राजकारण सुरू झाली आहे .छत्रपती संभाजी नगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उद्धव सेना पक्षाचे शहर प्रमुख विजय वाकचौरे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. वाकचौरे हे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात .मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा प्रवेश सोहळा झाला .या प्रवेशाने शहर उद्धव सेनेत खळबळ उडाली आहे .आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश उद्धव सेनेसाठी धक्कादायक आहे.
मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते शहरप्रमुख तथा माजी सभापती विजय वाघचौरे,उपजिल्हाप्रमुख संजय बारवाल,माजी नगरसेविका.शोभा पुखराज काळे,विभागप्रमुख एडवोकेट योगेश ठाकूर,निखिल तिवारी,संतोष बोर्डे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर वाघचौरे,संतोष बारवाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला .आमदार संजय शिरसाट यांच्या नेतृत्त्वाखाली तसेच जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा झाला.