उद्धव ठाकरेंनी मागितली औरंगाबादकरांची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:24 AM2018-04-20T00:24:03+5:302018-04-20T00:25:38+5:30

शहरातील ६५ दिवसांपासून झालेली कचराकोंडी येत्या आठ दिवसांत फुटेल; परंतु महापालिकेला कचराकोंडी फोडण्यात अपयश आले आहे. औरंगाबादकरांनी शिवसेनेवर टाकलेल्या विश्वासाला तडा गेल्यामुळे त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर माफी मागितली.

Uddhav Thackeray asked for Aurangabadkar's apology | उद्धव ठाकरेंनी मागितली औरंगाबादकरांची माफी

उद्धव ठाकरेंनी मागितली औरंगाबादकरांची माफी

googlenewsNext
ठळक मुद्देकचराकोंडी फोडण्यात महापालिकेला अपयश : महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी न देता राज्य शासनाकडूनही कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील ६५ दिवसांपासून झालेली कचराकोंडी येत्या आठ दिवसांत फुटेल; परंतु महापालिकेला कचराकोंडी फोडण्यात अपयश आले आहे. औरंगाबादकरांनी शिवसेनेवर टाकलेल्या विश्वासाला तडा गेल्यामुळे त्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जाहीर माफी मागितली. ते सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे दोन दिवस मराठवाडा दौऱ्यावर असून, ते संघटनात्मक पदाधिकाºयांची मते जाणून घेत आहेत.
ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या बैठकीपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले, खा. चंद्रकांत खैरे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि मनपा अधिकाºयांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले की, कचºयाची समस्या बिकट झाली असून, त्याला गती नाही. औरंगाबादवासीयांची माफी मागतो. हे काम शासन, प्रशासनाचे आहे. औरंगाबादकरांनी आमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे त्यांची क्षमा मागतो. आज जी चर्चा झाली आहे, त्यानुसार मनपा अधिकाºयांनी ८ ते १० दिवसांत कचराकोंडी सुटेल, असे आश्वासन दिले आहे. या विषयात राजकारण आणू इच्छित नाही. शहराला मनपा आयुक्त नाही. पोलीस आयुक्त प्रभारी आहेत. जिल्हाधिकाºयांची बदली केली. या सगळ्या बाबींमध्ये मार्ग काढणे सुरू आहे. नागरिकांना त्रास होतो आहे. नागरिकांची पुन्हा एकदा क्षमा मागतो. शहराची कचराकोंडी लवकरच फुटेल. कचरा टाकण्यासाठी जेथे पालिका गेली तेथे विरोध झाला. सर्वांनी सहकार्य करावे.
कचराकोंडी सोडविण्यात स्थानिक नेतृत्व अपयशी ठरले आहे काय? यावर ठाकरे म्हणाले की, नाही नेतृत्व अपयशी ठरले नाही; परंतु सर्वांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, यंत्रणा काम करीत असताना शासनाकडून मनपा आयुक्त नाहीत. पूर्ण वेळ पोलीस आयुक्त नाहीत. जिल्हाधिकारी रुजू झालेले नाहीत. मग काम कसे करणार; परंतु ६२ दिवसांत कचरामुक्ती का झाली नाही. यावर ठाकरे म्हणाले की, जनता सध्या कचरामुक्ती मागते आहे. सरकारनेदेखील इतरत्र जागा उपब्ध करून दिली पाहिजे. यंत्रणा, मशिनरी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था शासनाने केली पाहिजे. भाजपने कोंडी केली आहे काय, यावर राजकारण करू इच्छित नसल्याचे ठाकरे म्हणाले. सरकार आणि प्रशासनाने एकत्रित काम करावे.

विदर्भात पावसाळी अधिवेशन नकोच
पावसाळी अधिवेशन विदर्भाऐवजी मुंबईतच व्हावे. विदर्भासाठी नुसते अधिवेशन घेण्यापेक्षा विदर्भाला अमलात आणू शकाल त्या योजना द्या. जमीन निर्बंधमुक्तीचा निर्णय घेताना अधिवेशनाची गरज वाटली नाही, असा टोला लगावत शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी विदर्भात पावसाळी अधिवेशन घेण्याच्या भाजपच्या मागणीला ‘खो’ दिला. विदर्भात यापूर्वीच सर्व योजना नेल्या आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावर ठाकरे म्हणाले की, मी तसा भेदभाव करीत नाही. विदर्भाला ५० हजार कोटी देऊ, अशी घोषणा करू नका ना, आता नुसत्या ‘स्वप्नरंजनगुटिका’ देऊन काही होणार नाही. लोकांना लक्षात आले आहे. शिवसेना सरकारमध्ये असल्यामुळे मी कठोरपणे बोलत आहे.

Web Title: Uddhav Thackeray asked for Aurangabadkar's apology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.