उद्धव ठाकरे यांनी ३० मिनिटांच्या भाषणात १७ वेळेस नरेंद्र मोदींचे नाव घेत केली टीका!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 11:47 AM2024-11-15T11:47:30+5:302024-11-15T11:54:34+5:30
३० मिनिटांच्या भाषणात कोणत्या मुद्याला किती वेळ?
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर गुरुवारी रात्री झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तब्बल १७ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत टीका केली. अमित शाह यांचा ७ वेळा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ५ वेळा उल्लेख करीत टीका केली.
३० मिनिटांच्या भाषणात कोणत्या मुद्याला किती वेळ?
नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका : ६ मिनिटे
मेडिकल डिव्हाईस पार्क गुजरातला पळविला : २ मिनिटे
शहराच्या नामकरणाचा मुद्दा : १ मिनिटे
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पडलेला पुतळा : १ मिनिट
चिकलठाणा विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा : १ मिनिट
बॅग तपासणी व इतर : ४ मिनिटे
शालेय शिक्षण, महिला सुरक्षितता : ४ मिनिटे
वचननामा, निष्ठावानांचे कौतुक : ५ मिनिटे
महाविकास आघाडीच्या उमेदवाराविषयी : २ मिनिटे