उदगीर, जळकोटचे प्रकल्प तहानलेलेच !

By Admin | Published: October 26, 2014 11:45 PM2014-10-26T23:45:05+5:302014-10-27T00:10:47+5:30

उदगीर/जळकोट उदगीर व जळकोट तालुक्यात यंदा झालेल्या अल्प पर्जन्यमानामुळे पाण्याची ओरड सुरु झाली आहे़ तिरु प्रकल्प वगळता या दोन्ही तालुक्यातील एकही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही़

Udgir, the project of thirsty thirsty! | उदगीर, जळकोटचे प्रकल्प तहानलेलेच !

उदगीर, जळकोटचे प्रकल्प तहानलेलेच !

googlenewsNext


 उदगीर/जळकोट
उदगीर व जळकोट तालुक्यात यंदा झालेल्या अल्प पर्जन्यमानामुळे पाण्याची ओरड सुरु झाली आहे़ तिरु प्रकल्प वगळता या दोन्ही तालुक्यातील एकही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही़ लघु तलावांमध्ये खरडण लागली आहे़ त्यामुळे टंचाईसदृश स्थिती निर्माण होत आहे़
उदगीर तालुक्यातील हेर, हाळी-हंडरगुळी हा पट्टा वगळता इतर क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नाही़ या पट्ट्यातही पूर्वा नक्षत्राच्या सुरुवातीलाच एका दिवसात मोठा पाऊस झाला़ त्यातील बहुतांश भाग तिरु प्रकल्पाच्या क्षेत्रात येत असल्याने तिरु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे़ आजघडीला या प्रकल्पात १०० टक्के जलसाठा उपलब्ध आहे़ प्रकल्पाची क्षमता १५़२९ इतकी आहे़ सध्या त्यात इतकेच पाणी उपलब्ध आहे़ परंतु, तालुक्यातील दुसरा मध्यम प्रकल्प देवर्जन मात्र रिता-रिता आहे़ या प्रकल्पाची क्षमता १०़६८ दलघमी इतकी असताना आजघडीला त्यात केवळ ४़२ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ ज्याची टक्केवारी ४० टक्के इतकीच आहे़ उदगीर तालुक्यात १२ लघु तलाव आहेत़ त्यांची क्षमता २३ दसलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची असताना यंदा झालेल्या कमी पावसामुळे सध्या ९़५ दलघमी इतकाच साठा झाला आहे़ त्यातही अध्यापेक्षा अधिक तलाव कोरडेठाक पडले आहेत़
जळकोट तालुक्यात एकूण १५ लघु तलाव आहेत़ त्यांची क्षमता ३१़५ दलघमी पाणी साठविण्याची आहे़ परंतु, त्यातही सध्या ७़७ दलघमी इतकेच पाणी उपलब्ध आहे़ ढोरसांगवी, सोनाळा, धोंडवाडीचे तलाव पूर्णपणे कोरडे आहेत़ त्यामुळे पाण्याची मोठी टंचाई उदगीर व जळकोट तालुक्यात जाणवत आहे़
गेल्या सहा वर्षांत तिरु मध्यम प्रकल्प चार वेळा पूर्ण क्षमतेने भरला आहे़ २०१०, २०१२, २०१३ व यंदा प्रकल्प १०० टक्के भरले़ परंतु, २००९ साली मात्र त्यात एक थेंबही पाणी नव्हते़ २०११ मध्ये या प्रकल्पात १२़७४ दलघमी पाणी उपलब्ध होते़ देवर्जन मध्यम प्रकल्प मात्र सहा वर्षांत २०१० व २०११ या दोन वर्षीच पूर्ण क्षमतेने भरला़ २००९ मध्ये या प्रकल्पालाही कोरड लागली होती़ २०१२ मध्ये केवळ ३़१३ तर २०१३ मध्ये ८़६७ दलघमी इतके पाणी होते़

Web Title: Udgir, the project of thirsty thirsty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.