उमरी, हिमायतनगरात गोलेवार समाजाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:44 AM2017-09-14T00:44:34+5:302017-09-14T00:44:34+5:30
सावरखेड ता. नायगाव येथील अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून हत्या करणाºया नराधमाविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गोलेवार समाजाचा उमरी व हिमायतनगर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरी/हिमायतनगर : सावरखेड ता. नायगाव येथील अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून हत्या करणाºया नराधमाविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी गोलेवार समाजाचा उमरी व हिमायतनगर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सावरखेड ता. नायगाव येथे गणेश विसर्जन मिरवणूक चालू असताना आरोपी गिरीष गंगाराम कोठेवाड रा. मुदखेड याने ऋषिकेश आपतवाड या बालकास हनुमान मंदिराच्या पाठीमागील आवारात नेऊन लैंगिक अत्याचार केले, दारूच्या बाटलीने गळ्यावर वार करून जिवे मारून टाकले. एवढी भयानक घटना घडल्यावरही केवळ कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणून उमरी तालुक्यातील गोला-गोलेवार समाजाच्या वतीने आज बुधवारी जाहीर निषेध करीत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
पेशकार यांना निवेदन देण्यात आले. मोर्चास विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला. मोर्चात गोलेवार समाजातील विद्यार्थी, महिला, पुरुष मोठ्या प्रमाणात हजर होते. कैलासराव गोरठेकर, साहेबराव शिंदे, बालाजी गोमासे, राजेश जाधव, सदाशीव पालदेवाड, संदीप कवळे, शेषराव उमाटे, शिवा गोडगे, गंगाधर सिद्धेवाड, गणेश आनेमवाड, पिराजी जीडेवाड, विजय जंगीलवाड, संजय आऊलवार, गोविंद बकावाड, नारायण आकमवाड, नारायण बारदेवाड, रघू गोडगे, बालाजी तोगरवाड, देवीदास आकमवाड, मारोती घुमलवाड, दत्ता कानगुलकर, आपतवाड, ज्ञानदीप घोसलवाड, गणेश कोंडेवाड, दयानंद चंदेवाड आदीसह समाजबांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.