अनेक भागात अघोषित भारनियमन; महावितरणचे फोन बंद, सर्वसामान्यांचे कोण ऐकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 08:06 PM2024-09-23T20:06:14+5:302024-09-23T20:06:24+5:30

सलग तीन दिवसांपासून सायंकाळी वीज गुल; महावितरणचे अधिकारी उचलेनात फोन

Unannounced load shedding in some areas of Chhatrapati Sambhajinagar; Mahavitaran's phone is switched off, who will listen to the common man | अनेक भागात अघोषित भारनियमन; महावितरणचे फोन बंद, सर्वसामान्यांचे कोण ऐकणार?

अनेक भागात अघोषित भारनियमन; महावितरणचे फोन बंद, सर्वसामान्यांचे कोण ऐकणार?

छत्रपती संभाजीनगर : मागील तीन ते चार दिवसांपासून शहरातील काही भागात अघोषित भारनियमन सुरू आहे. दाद मागण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन लावले तर ते फोन उचलत नाहीत. सर्वसामान्यांचे कोण ऐकणार ? नेमकी सायंकाळी वीज गुल होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सलग तीन दिवसांपासून सायंकाळी वीज गुल
शहरातील रोशन गेट, किराडपुरा, बारी कॉलनी, रहमानिया कॉलनी, रहिमनगर या भागात गुरुवार, शुक्रवार व शनिवारी सलग तीन दिवस सायंकाळी ६:३० ते रात्री ८ वाजेदरम्यान विद्युतपुरवठा खंडित होत आहे. त्याचा येथील व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय सातारा परिसर, देवळाई परिसर, जाधववाडी, चिकलठाणा, छावणी, हिमायतबाग, बायजीपुरा, हर्सूल शहरातील काही भागात अघोषित भारनियमन सुरू आहे. विद्युतपुरवठा कधी खंडित होईल याचा नेम नाही.

कोणीच फोन घेत नाही
महावितरणची सेवाही अत्यावश्यक सेवेत येते. यामुळे अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना २४ तास अलर्ट मोडवर रहावे लागते. विद्युतपुरवठा खंडित होतो त्याचवेळी नागरिक फोन करीत असतात. जेव्हा फ्यूज कॉल सेंटरमध्ये कोणी फोन उचलत नाही त्यावेळेस नागरिक अधिकाऱ्यांना फोन लावतात; पण अधिकारी फोन उचलत नाहीत. मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांना फोन लावला असता त्यांनी तो कॉल उचलला नाही.

भारनियमनाची आधी सूचना देणे आवश्यक
विजेची मागणी वाढल्यावर व त्या तुलनेत पुरवठा कमी असल्यावर भारनियमन केले जाते; मात्र महावितरणची जबाबदारी आहे की त्यांनी भारनियमन करण्याआधी ग्राहकांना सूचना देणे आवश्यक आहे; पण महावितरण आपली जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून आले आहे. शहरात शक्यतो भारनियमन करू नाही. भारनियमनाआधी सूचना देणे व सायंकाळी भारनियमन न करता दुपारी किंवा सकाळी करावे.
- रहिम खान, रहिवासी, किराडपुरा

Web Title: Unannounced load shedding in some areas of Chhatrapati Sambhajinagar; Mahavitaran's phone is switched off, who will listen to the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.