बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 07:35 PM2018-11-12T19:35:42+5:302018-11-12T19:36:47+5:30

जड वाहनांचा ठिय्या : वाहतूक शाखेचे कोंडीकडे दुर्लक्ष वाळूज महानगर: वाळूज औद्योगिकनगरीत बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या ...

 Uncertain traffic leads to increased risk of accidents | बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला

बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला

googlenewsNext

जड वाहनांचा ठिय्या : वाहतूक शाखेचे कोंडीकडे दुर्लक्ष
वाळूज महानगर: वाळूज औद्योगिकनगरीत बेशिस्त वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या परिसरात ठिकठिकाणी अवजडवाहने रस्त्यावरच पार्क केली जात असल्याने सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. वाळूजसाठी स्वतंत्र वाहतूक शाखा असतानाही वाहतुकीला शिस्त लागत नसल्याने कार्यपद्धतीवर साशंकता व्यक्त केली जात आहे.


औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात देशाच्या विविध भागांतून वाहनाद्वारे कच्चा व पक्क्या मालाची ने-आण सुरु असते. या परिसरात माल घेऊन येणारी मालवाहु वाहने कामगार चौक, महावीर चौक, मोरे चौक, आंबेडकर चौक, रांजणगावरोड, साजापूररोड, टिसीआय गोडावुन, नगररोडवरील पेट्रोल पंप आदी ठिकाणी सर्रासपणे रस्त्याच्याकडेला थांबलेली असतात. या प्रकारामुळे औद्योगिकनगरीत सतत वाहतुकीची कोंडी होते. तसेच छोटे वाहनधारक, दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना जिव मुठीत घेऊनच ये-जा करावी लागत आहेत.

या परिसरात कामगार चौकात एमआयडीसी प्रशासनाकडून वाहनतळ उभारले आहे. मात्र, तेथे आवश्यक सुविधा नसल्याने तसेच वाहनतळाचे शुल्क वाचविण्यासाठी अनेक वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करतात. बजाज आॅटो कंपनीकडून स्वतंत्र वाहनतळ उभारले आहे. मात्र, अनेक जड वाहने गरवारे गेट ते टीसीआय गोडावून या मार्गावरील रस्त्याच्याकडेला उभी केली जातात. नगर-औरंगाबाद या महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. याप्रकारामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात असून, संबंधित विभागातील उच्च पदस्थ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.


अपघाताचा धोका वाढला
गोलवाडी फाटा पासून पथकर नाक्यापर्यंत ठिकठिकाणी अवजड वाहने रस्त्याच्याकडेला थांबलेली असतात. महामार्गासह औद्योगिक क्षेत्रात अवजड वाहनांनी अतिक्रमण केल्यामुळे यापूर्वी अनेकदा गंभीर अपघात झाले आहेत. काही जणांना प्राण गमवावे लागले आहे. अपघातानंतर काही दिवस या मार्गावर जडवाहनाचे थांबे बदलतात. नंतर पुन्हा जैसे थे वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्यामुळे कामगार, उद्योजक व प्रवाशांना जिव मुठीत धरुन या मार्गावरुन प्रवास करावा लागत आहे.


वाहतुक शाखेचे दुर्लक्ष
वाळूज औद्योकिगनगरीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरु केली. सुरवातीला वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाºयांनी वाहतुकीची कोंडी करणाºया वाहनधारकावर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, आजघडीला जडवाहनांचे अघोषित थांबे तयार झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच दुचाकी विक्री करणाºया शोरुमच्या मालकांनी मुख्य रस्त्याचा ताबा घेतला आहे.

Web Title:  Uncertain traffic leads to increased risk of accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.