रॉकेलटंचाईकडे पुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

By Admin | Published: May 20, 2014 01:22 AM2014-05-20T01:22:27+5:302014-05-20T01:33:09+5:30

वाळूज महानगर : वाळूज परिसरात गरीब कामगार व शिधापत्रिकाधारकांना रॉकेलटंचाईचा सामना करावा लागत असून,

Uncertainty neglect of the supply department of rocket poverty | रॉकेलटंचाईकडे पुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

रॉकेलटंचाईकडे पुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज परिसरात गरीब कामगार व शिधापत्रिकाधारकांना रॉकेलटंचाईचा सामना करावा लागत असून, याकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील पंढरपूर, वडगाव, रांजणगाव, वाळूज, कमळापूर आदी ठिकाणी नागरिकांना तीव्र रॉकेलटंचाईला सामोरे जावे लागत आहे. रॉकेल मिळविण्यासाठी स्वस्त धान्य दुकाने तसेच रॉकेल विक्रेत्यांकडे सकाळपासूनच मोठी गर्दी उसळते. रॉकेल खरेदी करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना सकाळपासून लांबच-लांब रांगा लावाव्या लागत आहेत. रॉकेल घेण्यासाठी मोठी गर्दी उसळत असल्यामुळे रांगेत उभे राहण्यावरून वादावादीच्या घटना घडत आहेत. तासन्तास रांगेत थांबूनही रॉकेल मिळत नसल्यामुळे शिधापत्रिकाधारकांत नाराजीचा सूर उमटत आहे. या परिसरात नियमित व मुबलक रॉकेलपुरवठा होत नसल्यामुळे विक्रेते व शिधापत्रिकाधारकांतही खटके उडत आहेत. पुरवठा विभागाने रॉकेलचा कोटा कमी केल्याचे कारण दाखवीत दोन ते पाच लिटर रॉकेल देऊन शिधापत्रिकाधारकांची बोळवण केली जात असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे. औद्योगिक वसाहतीमुळे या भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गरीब कामगार वर्ग वास्तव्यास असून, विविध कारखान्यांत मिळेल ते काम करून कामगार आपली उपजीविका भागवीत असतात. जेमतेम मजुरीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना कामगारांची ससेहोलपट होत आहे. गॅस खरेदी करणे कामगारांच्या आवाक्यात नसल्यामुळे तसेच जळतणासाठी लाकडे मिळत नसल्यामुळे कामगारांना स्वयंपाकासाठी रॉकेलचा उपयोग करावा लागतो. मात्र, रॉकेलही नियमितपणे मिळत नसल्यामुळे कामगारांत असंतोषाचे वातावरण आहे. दक्षता समितीही गायब गावात स्वस्त धान्य दुकानामार्फत वाटप करण्यात येणार्‍या जीवनावश्यक वस्तू व रॉकेलचे वितरण सुरळीतपणे व्हावे, यासाठी ग्रामस्तरावर दक्षता समित्या नेमण्यात आलेल्या आहेत. मात्र, या दक्षता समित्यांचे वितरणव्यवस्थकडे दुर्लक्ष असल्यामुळे समित्यांचे अस्तित्व केवळ कागदोपत्रीच उरले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शिधापत्रिकाधारकांची संख्या वाढत असताना अन्नधान्य व रॉकेलच्या कोट्यात कपात करण्यात आल्यामुळे गरीब कामगार व शिधापत्रिकाधारक त्रस्त झाले आहेत.

Web Title: Uncertainty neglect of the supply department of rocket poverty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.