शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:03 AM2021-07-11T04:03:56+5:302021-07-11T04:03:56+5:30

सिल्लोड : तालुक्यातील लिहा येथे दोन गटांत शेतीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. यात पुतण्याने काकाच्या डोक्यात लाकूड मारल्याने ७० ...

Uncle murdered by nephew over agricultural dispute | शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

googlenewsNext

सिल्लोड : तालुक्यातील लिहा येथे दोन गटांत शेतीच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. यात पुतण्याने काकाच्या डोक्यात लाकूड मारल्याने ७० वर्षीय वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली, तर एकाची प्रकृती गंभीर असून, त्यास औरंगाबादला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अजिंठा पोलिसांनी खून करणाऱ्या दोन्ही आरोपीस ताब्यात घेतले आहे. दत्तात्रय दिगंबर साखले (७०, रा. लिहा, ता. सिल्लोड) असे मयताचे नाव आहे.

लिहा परिसरात दत्तात्रय साखले आणि आरोपी संदीप साखले, योगेश साखले यांची शेती आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या बांधावरून त्यांच्यात वाद सुरू होते. शनिवारी वाद विकोपाला गेल्याने त्यांच्यात भांडणे झाली. यात दत्तात्रय साखले यांच्या डोक्यात लाकूड मारल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री पुढे आले. याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी आरोपी संदीप साखले, योगेश साखले यांना अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल, सपोनि गिरीधर ठाकूर, फौजदार आर.डी. राठोड, बाबा चव्हाण, सोनवणे जगदीश, संदीप जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. शेतीच्या बांधाच्या वादातून हा खून झाला आहे.

Web Title: Uncle murdered by nephew over agricultural dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.