बेफाम टिप्पर चालकाचा गंगापूर शहरात धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:04 AM2021-09-18T04:04:27+5:302021-09-18T04:04:27+5:30

सिन्नर येथील टिप्पर मालकाने आपला टिप्पर विक्रीची जाहिरात एका ऑनलाइन वेबसाइटवर दिली होती. त्या जाहिरातीनुसार औरंगाबाद येथील ग्राहकाने सदरील ...

Uncontrollable tipper driver in Gangapur city | बेफाम टिप्पर चालकाचा गंगापूर शहरात धुडगूस

बेफाम टिप्पर चालकाचा गंगापूर शहरात धुडगूस

googlenewsNext

सिन्नर येथील टिप्पर मालकाने आपला टिप्पर विक्रीची जाहिरात एका ऑनलाइन वेबसाइटवर दिली होती. त्या जाहिरातीनुसार औरंगाबाद येथील ग्राहकाने सदरील टिप्पर खरेदी करून दरमहा ५० हजार रुपये देण्याचे कबूल केले होते; परंतु काही महिन्यांपासून खरेदीराने नियमित पैसे दिले नाही व संपर्कदेखील खंडित केला. यामुळे मूळ मालकाने शुक्रवारी सदरील टिप्पर औरंगाबाद येथून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेऊन ते गंगापूर मार्गाने सिन्नरकडे जात होते. तेव्हा खरेदीदाराने वैजापूर मार्गावर काही मित्रांच्या मदतीने टिप्पर पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन औरंगाबादच्या दिशेने सुसाट पळविला. पाठलाग चुकविण्यासाठी औरंगाबादच्या दिशेने बेफाम जाणाऱ्या या टिप्परने गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी सात वाजेदरम्यान एका उभ्या दुचाकीचा चुराडा केला. नंतर एका फळे विक्रेत्याला उडविले, तसेच पुढे आणखी एका दुचाकीला धडक दिली. यापूर्वी शहरातील पंपासमोर एका वाहनाला हूल दिली, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रस्त्यावर असलेल्या नागरिकांच्या काळजात धस्स झाले होते.

चौकट

पोलिसांनी टिप्पर घेतला ताब्यात

बेफाम निघालेल्या या टिप्पर चालकामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. यावेळी अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती व शहरात अफवांचे पेव फुटले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून सदरील टिप्पर ठाण्यात जमा केले आहे. या टिप्परवर क्रमांकाचीदेखील खाडाखोड करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची ठाण्यात नोंद करण्यात आला नव्हती.

170921\20210917_192857.jpg

गंगापूर : पोलीस ठाणे परिसरात उभा असलेला विना क्रमांकाचा हायवा

Web Title: Uncontrollable tipper driver in Gangapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.