औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ६० हजार जोडण्या कापल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:08 AM2018-02-24T00:08:38+5:302018-02-24T00:08:45+5:30

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत चार परिमंडळांमध्ये घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांकडे १९ लाख २५ हजार, तर ४१५ ग्राहकांकडे तब्बल १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. सातत्याने वाढत चालेल्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. थकबाकी वसुली मोहिमेत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड या परिमंडळांतील ५९ हजार ४६२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Under the Aurangabad Regional Office 60,000 connections were cut | औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ६० हजार जोडण्या कापल्या

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ६० हजार जोडण्या कापल्या

googlenewsNext
ठळक मुद्देमहावितरण : १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत चार परिमंडळांमध्ये घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांकडे १९ लाख २५ हजार, तर ४१५ ग्राहकांकडे तब्बल १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. सातत्याने वाढत चालेल्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. थकबाकी वसुली मोहिमेत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड या परिमंडळांतील ५९ हजार ४६२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
यासंदर्भात प्रादेशिक कार्यालयाचे म्हणणे आहे की, बहुतांश ग्राहकांची वीज बिल भरण्याची मानसिकता नाही. त्यामुळे थकबाकीची आकडेवारी सातत्याने वाढत चालली आहे. महावितरणसमोर आता वीज बिल वसुलीशिवाय दुसरा पर्याय नाही. या मोहिमेत १० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक व अन्य थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत ४४ हजार ९१९ ग्राहकांकडून ७२ कोटी १० लाख रुपये एवढी वीज बिलांची वसुली करण्यात आली आहे.
प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद परिमंडळाच्या ३ लाख ९९ हजार ३३८ ग्राहकांकडे २१५ कोटी ५ लाख रुपये, जळगाव परिमंडळातील ४ लाख ८२ हजार २४५ ग्राहकांकडे १८१ कोटी २६ लाख रुपये, लातूर परिमंडळात ४ लाख ९४ हजार ८७१ ग्राहकांकडे ६३५ कोटी ६ लाख रुपये, तर नांदेड परिमंडळात ५ लाख ४८ हजार ९६१ ग्राहकांकडे ४६७ कोटी ९२ लाख रुपये, अशी एकूण १९ लाख २५ हजार ४१५ ग्राहकांकडे १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे १५ हजार ९३८ वीज जोडण्या असून, यांच्याकडे ६९१ कोटी ३२ लाख रुपये, तर पथदिव्यांच्या २१ हजार ४८ वीज जोडण्यांकडे १ हजार ४५९ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी आहे.
थकबाकी वसुलीसाठी पथके दारोदारी
महावितरणकडून राबविण्यात येणाºया शून्य थकबाकी मोहिमेंतर्गत वीज बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेत अभियंते व कर्मचाºयांची पथके दारोदारी जाऊन थकबाकीची वसुली करीत आहेत. जे थकबाकीदार ग्राहक प्रतिसाद देत नाहीत, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणच्या शाखा व उपविभागीय कार्यालयात वीज बिलांच्या दुरुस्तीसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. ज्या ग्राहकांच्या वीज बिलांसंदर्भात तक्रारी असतील, अशा ग्राहकांनी जवळच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक कार्यालयाने केले आहे.

Web Title: Under the Aurangabad Regional Office 60,000 connections were cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.