मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास करून दाखवू

By Admin | Published: June 29, 2014 12:48 AM2014-06-29T00:48:24+5:302014-06-29T01:04:59+5:30

वैजापूर : नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाचा विकास करून दाखवू, अशी ग्वाही अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वैजापूर येथे दिली.

Under Modi government, we will showcase the country's development | मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास करून दाखवू

मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास करून दाखवू

googlenewsNext

वैजापूर : नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाचा विकास करून दाखवू, अशी ग्वाही अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वैजापूर येथे दिली.
केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शहरात त्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर, विकास कुलकर्णी, किशोर धनायत, सिल्लोडचे नगरसेवक सुनील मिरकर, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष कैलास पवार, नारायण कोल्हे, प्रकाश गायके आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पंतप्रधान ग्रामसडक योजना पुन्हा सुरू करणार असून देशात नदीजोड प्रकल्प हाती घेणार आहेत. वैजापूर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी माझे नेहमीच सहकार्य राहील व लागणारा निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तालुक्यात नवीन कारखान्याची उभारणी करा. त्यासाठी मी परवानगी देतो, असे त्यांनी सांगितले.
भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष कैलास पवार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. प्रकाश गायके यांनी आभार मानले. याप्रसंगी संभाजी कलापुरे, विजय कोतकर, रामभाऊ शिंदे, विनोद कदम, महावीर बाफना, सुनील संतपाळ, प्रकाश बोथरा, शशिकांत निकाळे, ज्ञानेश्वर मगर, सुनील कदम, रमेश बोरनारे, सुनील पैठणपगारे, आनंदी अन्नदाते आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
भाजपा जिल्हाध्यक्षांनी डागली
स्थानिक सेना नेत्यांवर तोफ
भाजपाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी आपल्या भाषणात सेनेच्या स्थानिक नेत्यांवर तोफ डागली. सेनेने झालेल्या नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत धोका दिला. युती करून लढलो असतो तर कदाचित तालुक्यात युतीची सत्ता राहिली असती; परंतु त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला. पर्यायाने आज एकाही संस्थेवर सेनेचे बहुमत नाही. विनायक साखर कारखाना सुरू करावा व रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेचे कर्ज माफ करून शासनाने ही योजना ताब्यात घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Web Title: Under Modi government, we will showcase the country's development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.