स्व-विकास व कला विषय अभ्यासात पूर्ववत ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:05 AM2021-03-26T04:05:17+5:302021-03-26T04:05:17+5:30

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे, जिल्हा शाखा औरंगाबादच्यावतीने गुरुवारी याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री ...

Undo self-development and art subjects | स्व-विकास व कला विषय अभ्यासात पूर्ववत ठेवा

स्व-विकास व कला विषय अभ्यासात पूर्ववत ठेवा

googlenewsNext

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे, जिल्हा शाखा औरंगाबादच्यावतीने गुरुवारी याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आले.

या विषयांमुळे विद्यार्थी जीवनातील विविध संकटांना व आव्हानांना समक्षमपणे सामोरे जाऊ शकतात. तसेच ‘स्व’ओळख होऊन संधी ओळखण्याची क्षमता निर्माण करू शकतात. इयत्ता ९ वी व १० वीसाठी जलसुरक्षा विषय हा विज्ञान व भूगोल या घटकात समाविष्ट करावा व याचे परिपत्रक रद्द करावे. नवीन संचमान्यतेमध्ये पूर्वीप्रमाणेच कलाशिक्षक हा विशेष शिक्षक म्हणूनच गणला जावा, ए.एम. केलेल्या कलाशिक्षकाला त्वरित वेतनश्रेणी मिळावी, तसेच विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक शाळेत कलाशिक्षक घेण्यात यावा, अशा मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

जिल्हाध्यक्ष विजयकुमार गोसावी, उपजिल्हाध्यक्ष संदीप पाटील, सचिव सचिन भोरे, सहसचिव नितिन वेताळ, कोषाध्यक्ष सोपान करवंदे, दिलीप वाढे, दिनेश कुलकर्णी, ज्योती लोणे, ज्ञानेश्वर तायडे, कैलास पांडव, योगेश लंके, सुनील तिडके, विजय गवळी, सुधीर गोळे व विपुल तिळवे आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Undo self-development and art subjects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.