पतीचे भावजयीसोबत अनैतिक संबंध

By Admin | Published: June 24, 2017 12:19 AM2017-06-24T00:19:22+5:302017-06-24T00:20:47+5:30

बीड : दोन मुलांना जाळून मारणाऱ्या आपल्या पतीचे भावजयीसोबतच अनैतिक संबंध होते, अशी फिर्याद निर्दयी पित्याने जाळून मारलेल्या मुलांच्या आईने दिंद्रूड पोलीस ठाण्यात दिली आहे

Unethical relationship with husband's brother | पतीचे भावजयीसोबत अनैतिक संबंध

पतीचे भावजयीसोबत अनैतिक संबंध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दोन मुलांना जाळून मारणाऱ्या आपल्या पतीचे भावजयीसोबतच अनैतिक संबंध होते, अशी फिर्याद निर्दयी पित्याने जाळून मारलेल्या मुलांच्या आईने दिंद्रूड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथे कुंदन वानखेडे या पित्याने आपल्या पोटच्या बलभीम आणि वैष्णव या दोन मुलांना जाळून मारले होते. त्यानंतर तो फरार झाला. रात्री मुलांची आई रेखा वानखेडे यांच्या फिर्यादीवरून दिंद्रूड पोलीस ठाण्यात पती कुंदन सुधाकर वानखेडे, सासरे सुधाकर वानखेडे, सासू विमल सुधाकर वानखेडे, दीर सचिन सुधाकर वानखेडे, भावजय अनिता सचिन वानखेडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, लग्नानंतर पती कुंदनचे भावजय अनितासोबत अनैतिक संबंध होते. वारंवार त्यांना सांगितले. परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे रेखा व कुंदन यांच्यात रोज वाद व्हायचे. या रोजच्या वादाला कंटाळून रेखा माहेरी निघून गेली.
त्यानंतर तिने न्यायालयात दावा टाकून मुलांची मागणी केली. याचा निकाल शुक्रवारी लागणार होता. पत्नी तर सोडून गेलीच आता मुलेही जाणार या विरहातून कुंदनने मुलांना मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अनिता व कुंदन यांच्यात काय संबंध होते, हे तपासानंतर समोर येईलच, असे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आर.एस.सानप यांनी सांगितले.
आरोपी फरार
कुंदन अगोदरच फरार होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच इतर आरोपींनीही धृूम ठोकली. ते अद्यापही फरारच असून त्यांच्या शोधासाठी दोन पथके नेमल्याचे सहायक पोलीस निरीक्षक आर.एस.सानप यांनी सांगितले.

Web Title: Unethical relationship with husband's brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.