देवळाई परिसरात अनोळखी महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:43 PM2019-01-29T22:43:44+5:302019-01-29T22:44:10+5:30
औरंगाबाद : देवळाई परिसरात विसर्जन तलावालगत मोकळ्या जागेवर एका २५ ते ३० वर्षीय महिलेचा खून करण्यात आला असून, अर्धनग्न अवस्थेत रक्ताने माखलेला मृतदेह पोलिसांना मिळून आला. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मृतदेह पोलिसांना आढळून आला. ओळख पटू नये म्हणून मृताचा चेहरा विद्रूप करण्यात आला आहे.
औरंगाबाद : देवळाई परिसरात विसर्जन तलावालगत मोकळ्या जागेवर एका २५ ते ३० वर्षीय महिलेचा खून करण्यात आला असून, अर्धनग्न अवस्थेत रक्ताने माखलेला मृतदेह पोलिसांना मिळून आला. मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मृतदेह पोलिसांना आढळून आला. ओळख पटू नये म्हणून मृताचा चेहरा विद्रूप करण्यात आला आहे.
देवळाई परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. अर्धनग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह विद्रूप करण्यात आल्याचे दिसले. घटनास्थळी श्वानपथक व फॉरेन्सिक टीमलादेखील पाचारण करण्यात आले होते. उत्तरीय तपासणीसाठी महिलेचा मृतदेह पोलिसांनी शासकीय दवाखान्यात पाठविला.
श्वान रोडवर घुटमळले
श्वानपथक घटनास्थळी आले. श्वान मृताजवळून पुढे चालत रोडपर्यंत गेले आणि तेथेच घुटमळले. त्यामुळे महिलेचा खून करून मारेकरी रस्त्यापर्यंत जाऊन तेथून वाहनाने देवळाई चौकाकडे रवाना झाले असावेत, असा अंदाजदेखील पोलिसांनी वर्तविला.
दरवर्षी जानेवारीत खून; पाचवी घटना
झाल्टा येथील रेल्वे लाईन, कादराबाद, बाळापूर आणि मंगळवारी देवळाई परिसरात अनोळखी महिलेचा खून झाला. गेल्या चार-पाच वर्षांपासून चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या पाच घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यातच खुनाचे प्रकार चिकलठाणा हद्दीत घडलेले आहेत, अशी चर्चा पोलीस वर्गात येथे सुरू होती.
पोलीस उपअधीक्षक अशोक आम्ले, भुजंग, सहायक निरीक्षक संजय आहेर तसेच विविध अधिकाºयांंनी घटनास्थळी भेट दिली. विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बेपत्ता महिलांच्या नातेवाईकांना बोलावून ओळख पटविण्याची प्रक्रिया करण्यात आली; परंतु ओळख पटली नाही. पोलीस ठाण्यातील मीसिंगविषयी देखील विविध ठाण्यांत कल्पना देण्यात आली. चार पथके रवाना करण्यात आले असून, महिला मजुरी करणारी असावी, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
खून झालेल्या महिलेचे वर्णन
उंची चार-साडेचार फूट, गळ्यात मंगळसूत्र, हिरव्या रंगाची फिकट फुले असलेली साडी, गुलाबी ब्लाऊज, पिवळा परकर असा पेहराव आहे. कुणाला माहिती असल्यास चिकलठाणा पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी केले.