देवगिरी कारखाना सुरू करण्यासाठी एकमुखी संमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:07 AM2021-02-05T04:07:24+5:302021-02-05T04:07:24+5:30
अवसायक श्रीराम सोन्ने यांनी विशेष सभा बोलावली होती. सभेला सुमारे साडेसहशे सभासदांनी हजेरी लावली होती. अवसायकांनी सभेच्या आयोजनाचे कारण ...
अवसायक श्रीराम सोन्ने यांनी विशेष सभा बोलावली होती. सभेला सुमारे साडेसहशे सभासदांनी हजेरी लावली होती. अवसायकांनी सभेच्या आयोजनाचे कारण स्पष्ट करत कारखान्याचे पुनर्जीवन करणे, कर्जाची तडजोड करण्याबाबत सभासदांची समंती हवी असल्याचे स्पष्ट करताच, सभासदांनी एकमुखी समंती दिली. यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ.नामदेवराव गाडेकर, माजी आमदार डॉ.कल्याण काळे, नगराध्यक्ष सुहास सिरसाठ, कारखान्याचे उपाध्यक्ष नितीन देशमुख, प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलास औताडे, काकासाहेब कोलगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, संदीप बोरसे, रामभाऊ शेळके, राजेंद्र जगदाळे, डॉ.नारायण फंड, सभापती चंद्रकांत जाधव, पुंडलिक अंभोरे, नारायण मते, अंकुश शेळके, विलास गव्हाड आदी उपस्थित होते.
--------
सभेची मागणी करणारे गैरहजर -----------
देवगिरी साखर कारखान्यावर प्रशासकीय मंडळ आणण्याच्या हालचाली होत असल्याचा आरोप करून, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विशेष सभा घेण्याची मागणी केली होती, पण सभा बोलावण्यात आल्यावर बागडे का आले नाही, त्यांना हा कारखाना सुरू करण्याची इच्छा नसल्याचा आरोप कारखान्याचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केला.