केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे रेल्वेच्या विशेष बोगीतून औरंगाबादेत दाखल, स्वागताला कार्यकर्त्यांची लोटालोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 10:44 AM2021-08-17T10:44:28+5:302021-08-17T10:45:19+5:30

देवगिरी एक्स्प्रेसला विशेष बोगी जोडून दानवे हे औरंगाबादेत पोहोचले.

Union Minister of State for Railways Raosaheb Danve arrives in Aurangabad from a special railway carriage. | केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे रेल्वेच्या विशेष बोगीतून औरंगाबादेत दाखल, स्वागताला कार्यकर्त्यांची लोटालोटी

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे रेल्वेच्या विशेष बोगीतून औरंगाबादेत दाखल, स्वागताला कार्यकर्त्यांची लोटालोटी

googlenewsNext

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच रावसाहेब दानवे (Raosaheb Sangave) हे विशेष बोगीतून प्रवास करीत मंगळवारी सकाळी औरंगाबादरेल्वे स्टेशनवर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. पुष्पहार, पुष्पगुच्छ देण्यासाठी अक्षरशः लोटालोटी झाली. 

रावसाहेब दानवे हे सचखंड एक्स्प्रेसने औरंगाबादला येणार होते. मात्र, सचखंड एक्स्प्रेस तब्बल ३ तास उशीरा धावत असल्याने ऐनवेळी नियोजन बदलावे लागले. देवगिरी एक्स्प्रेसला विशेष बोगी जोडून दानवे हे औरंगाबादेत पोहोचले. रेल्वेराज्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदा औरंगाबादला आल्याने रेल्वेस्टेशन शेकडो कार्यकर्ते जमले होते. सर्वांचे स्वागत स्विकारत दानवे रेल्वेस्टेशनवरून रवाना झाले.

त्यांच्या या दौऱ्यामुळे रेल्वे स्टेशनवर विविध खबरदारी घेण्यावर भर दिला गेला. स्वच्छतेपासून तर सोयीसुविधांच्या बाबतीत कोणतीही त्रुटी निदर्शनास येणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. मात्र, रेल्वे राज्यमंत्री नाराजी व्यक्त करतील, असा कोणताही प्रसंग उदभवला नाही. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

Web Title: Union Minister of State for Railways Raosaheb Danve arrives in Aurangabad from a special railway carriage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.