ऊस लागवडीसाठी अनोखे जुगाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:02 AM2018-01-09T00:02:43+5:302018-01-09T00:02:48+5:30
शेतीला लागणारा वाढता खर्च आणि मजुरांच्या टंचाईमुळे वैतागलेल्या अगरवाडगाव येथील पठाण बंधंूनी ऊस लागवडीसाठी अनोखे जुगाड जमविले. परिसरात पठाण बंधूंनी केलेल्या ऊस लागवडीच्या नवीन उपायाने शेतकºयांना नवीन तंत्र माहिती झाले आहे. येत्या काळात या बंधूंनी वापरलेले जुगाड इतरही शेतकरी वापरतील, अशी शक्यता आहे.
तारेख शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कायगाव : शेतीला लागणारा वाढता खर्च आणि मजुरांच्या टंचाईमुळे वैतागलेल्या अगरवाडगाव येथील पठाण बंधंूनी ऊस लागवडीसाठी अनोखे जुगाड जमविले. परिसरात पठाण बंधूंनी केलेल्या ऊस लागवडीच्या नवीन उपायाने शेतकºयांना नवीन तंत्र माहिती झाले आहे. येत्या काळात या बंधूंनी वापरलेले जुगाड इतरही शेतकरी वापरतील, अशी शक्यता आहे.
गंगापूर तालुक्यातील अगरवाडगाव येथील उस्मान पठाण यांच्या कुटुंबातील सुभान, अस्लम, आजम आणि अक्रम ही भावंडे शेती व्यवसाय करतात. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने शेती करून वर्षाच्या शेवटी हाती फारसे काही शिल्लक राहत नसल्याने पठाण कुटुंबिय त्रस्त झाले होते. त्यामुळे यावर्षी शेती करताना काहीतरी नवीन करून शेती परवडेल यासाठी उपाययोजना करण्याचे सर्वांनी ठरविले.
उसाच्या लागवडीसाठी एकरी तीन ते चार हजारांचा खर्च आणि मजुरांची टंचाई यावर काय मार्ग काढता येईल, याबाबत सगळेजण विचार करू लागले. पारंपारिक पद्धतीने उसाची लागवड करताना मजुरांच्या हाताने ऊस तोडणे, सरीत ऊस नेऊन टाकणे आणि लागवडीसाठी बेणे पसरविणे आदी कामे मजुरांच्या हाताने करावी लागतात.
मात्र पठाण बंधंूनी यासाठी ट्रॅक्टरच्या साह्याने लागवड करण्याचे जुगाड जमविले. सर्वप्रथम उसाचे बेणे तोडून एका ठिकाणी जमा केले. नंतर त्याचे लागवडीयोग्य तुकडे करून ट्रॅक्टरच्या मागील बाजूस ठेवले. एकाने लागवड करायची आहे . त्या सरीत ट्रॅक्टर चालवायचा, दोघांनी ट्रॅक्टरच्या मागील रेजरवर बसून सरीत एक-एक करून उसाचे टिपरु मातीत लावत चालायचे आणि एकाने उसाचे टिपरू ट्रॅक्टरपर्यंत आणून द्यायचे. या पद्धतीने उसाची लागवड केली.
पाच मजुरांना किमान आठ दिवस जाणारी लागवड या नवीन तंत्राने अवघ्या दोन दिवसांत उरकली. ट्रॅक्टर आणि लागवड करणारे घरचेच असल्याने खर्चाचाही विषय आला नाही. याच ऊस लागवडीसाठी मजुरांना किमान पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आला असता. हा सर्व खर्च आणि वेळ यामुळे वाचला.
पठाण बंधूंनी लागवडीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती परिसरात पोहोचताच अनेकांनी लागवड सुरू असलेल्या शेताला भेट दिली. एवढ्या सोप्या आणि सुटसुटीत असणाºया तंत्राने लागवड करणे आपल्यालाही जमेल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
शेतकºयांनी शेती करताना पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड दिली तर शेती करणे सोपे आणि सुटसुटीत होते, असे पठाण कुटुंबिय सांगतात. लागवडीसाठी लागणारा खर्च वाचला, आता तोच पैसा खतासाठी वापरता येईल. त्यामुळे उसाच्या उत्पादनात वाढ करणे शक्य होईल. येत्या काळात शेतीत आणखी काय नवीन करता येईल, यासाठी सगळेजण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.