बंद दिव्याखाली पणती लावून अनोखे आंदोलन

By Admin | Published: November 14, 2015 12:06 AM2015-11-14T00:06:16+5:302015-11-14T00:49:14+5:30

जालना : शहरातील संभाजी उद्यान मोतीबाग परिसरातील गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडलेल्या हायमॅक्स दिव्या खाली दीपावलीनिमित्त पणती पेटवून

Unique movement by closing lamps under the lamps | बंद दिव्याखाली पणती लावून अनोखे आंदोलन

बंद दिव्याखाली पणती लावून अनोखे आंदोलन

googlenewsNext


जालना : शहरातील संभाजी उद्यान मोतीबाग परिसरातील गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडलेल्या हायमॅक्स दिव्या खाली दीपावलीनिमित्त पणती पेटवून शिव आदेश या संघटनेने पालिकेविरूद्ध अनोखे आंदोलन केले.
गेल्या सहा महिन्यांपासून संभाजीपुतळा परिसरातील हायमॅक्स पथ दिवा बंद आहे. त्यामुळे उद्यानात आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. बंद असलेला दिवा सुरू करण्याची मागणी पालिकेकडे करून ही त्याची दखल घेतली नाही.
तो दिवा अद्याप बंदच असल्याने दिवाळी पाडव्याच्या दिवशी शिवआदेश या सामाजिक संघटनेच्या वतीने दिव्याला पुष्षहार घालून त्याखाली पणती लावून निषेध केला. यावेळी गणेश धायडे, आकाश खरात, भूषण राऊत, सचिन कांबळे, अंबादास म्हस्के, सिद्धार्थ मोरे, बंटी सावंत, योगेश गायकवाड, पवन राजाळे, अमोल खरात आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Unique movement by closing lamps under the lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.