युनायटेड ब्रेव्हरीज, जॉन्सन अँड जॉन्सन संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:08 PM2017-11-29T23:08:44+5:302017-11-29T23:09:00+5:30
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक करंडक क्रिकेट स्पर्धेत युनायटेड ब्रेव्हरीजने एस.जी.एस.टी. संघावर ५ गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात जॉन्सन अँड जॉन्सन संघाने हायकोर्ट संघवर ५ गडी राखून विजय मिळवला. हेमंत मिठावाला आणि स्वरूप बॅनर्जी हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक औद्योगिक करंडक क्रिकेट स्पर्धेत युनायटेड ब्रेव्हरीजने एस.जी.एस.टी. संघावर ५ गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात जॉन्सन अँड जॉन्सन संघाने हायकोर्ट संघवर ५ गडी राखून विजय मिळवला. हेमंत मिठावाला आणि स्वरूप बॅनर्जी हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.
युनायटेड ब्रेव्हरीज संघाविरुद्ध एसजीएसटी संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सर्वबाद ११६ धावा केल्या. त्यांच्याकडून विशाल गवळे याने ४० चेंडूंत ३ षटकार व ४ चौकारांसह ५७ धावांची स्फोटक खेळी केली. अमय करमारकरने २० धावा केल्या. युनायटेड ब्रेव्हरीजकडून पंकज फलके व श्रीकांत शिंदे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. संदीप गायकवाड, हर्षल शिर्के व संदीप नागरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात युनायटेड ब्रेव्हरीज संघाने विजयी लक्ष्य ५ गडी गमावून सहज गाठले. शैलीदार फलंदाज पंकज फलकेने ३८ चेंडूंत १ षटकार व एका चौकारांसह ३६, संदीप नागरेने २ चौकारांसह २१, संदीप गायकवाडने १४ व जुनैद शेखने नाबाद १२ धावा केल्या. एस.जी.एस.टी. संघाकडून जयंत नवरंगे, अशोक सूर्यवंशी, संतोष मेहेर व विशाल गवळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसºया सामन्यात हायकोर्ट संघाने २० षटकात ६ बाद १३१ धावा केल्या. त्यांच्याकडून ज्ञानेश्वर पाटीलने ३५ चेंडूंत ५ षटकार, ३ चौकारांसह ५५, अमोल काकडेने ३६ धावा केल्या. प्रत्युत्तरात जॉन्सन अँड जॉन्सन संघाने विजयी लक्ष्य ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून हेमंत मिठावाला याने ३७ चेंडूंत ७ चौकार, एका षटकारासह ४९, अनिरुद्ध पुजारीने २९ व भास्कर जिवरग व सतीश भुजंगे यांनी प्रत्येकी २० धावा केल्या. हायकोर्ट संघाकडून मनोज शिंदे व संदीप सहानी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.