देशातील विद्यापीठांनी संशोधनावर भर द्यावा
By Admin | Published: January 2, 2015 12:32 AM2015-01-02T00:32:22+5:302015-01-02T00:44:26+5:30
जालना : तक्षशिला नांलदा सारखे विद्यापीठ या देशाला लाभले तरी आपला देश संशोधनामध्ये मागे असल्याचे मत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ बी. ए. चोपडे यांनी खंत व्यक्त केली.
जालना : तक्षशिला नांलदा सारखे विद्यापीठ या देशाला लाभले तरी आपला देश संशोधनामध्ये मागे असल्याचे मत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ बी. ए. चोपडे यांनी खंत व्यक्त केली.
जिल्हातील प्राध्यापक व संस्थाचालक संघटनेच्या वतीने आयोजित उच्चशिक्षण : आज आणि उद्या या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ ए.जी. खान, प्रमुख उपस्थिती व्यवस्थापन परिषदेचे सदस्य शिवाजी मदन, सत्कारमुर्ती कुलसचिव डॉ डी.आर. माने प्राचार्य एम.डी. प्राथ्रीकर, डॉ आर.जी. अग्रवाल आदीची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेीळी बोलतांना चोपडे यांनी आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था आणि अमेरीका, जर्मनी, चिन, जपान यांच्याशी तुलना करतांना या देशांनी फक्त संशोधनातून जगावर राज्य करत असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे देशाचे शासन जे संशोधनाला चालना देत आहे त्याचा फायदा देशातील विद्यापीठ महाविद्यालयानी घ्यावा असे चोपडे म्हणाले. प्रत्येक महाविद्यालयांनी जगाची ओळख ओळखूनच शिक्षण देवून संशोधनावर भर देण्याचे चोपडे म्हणाले. फक्त ५ टक्के लोकसंख्या असलेला अमेरीका संशोधनाच्या माध्यमातून जगावर राज्य करत आहे ही ताकद संशोधनात आहे. जर्मन हा देश महाराष्ट्रापेक्षा लहान असून तेथे हजारो विद्यापीठ आहेत. पंरतु भारतात फार कमी विद्यापीठ आहे अशी तुलना करत कुलुगुरू यांनी संशोधनावर भर देण्याचे आवाहन केले. अमेरीकेत सर्व विद्यापीठे खाजगी असून त्यांची प्रगती देखण्यासारखी आहे. भारतात सर्व विद्यापीठ सरकारी असून सुद्धा प्रगती कमी असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात डॉ खान यांनी समांतर संधी उपलंब्ध झाल्याशिवाय उच्चशिक्षणात प्रगती झाली असे म्हणता येणार नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी काळाची गरज ओळखून विविध नविन अभ्याक्रम सुरू करावे.असे मत खान यांनी व्यक्त केले.विद्यापीठाचे काम हे निव्वळ परिक्षे घेण नाही तर संशोधनाल चालना ेदेणे आहे पंरतु विदर््यापीठा संपूर्ण वेळ परिक्षा घेण्यात आली उत्तर पत्रीका तपासण्यात जात असल्याचे देखील खान म्हणाले हे कुठे तरी बदले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उच्च होण्यासाठी शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्यांना व्यतीना सामाजिक बांधिलकीची गरज असल्याचे खान म्हणाले. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण विचार करण्सासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे खान म्हणाले . यावेळी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण संचालक पदी निवड झाल्याबद्दल कुलसचिव डॉ धनराज माने यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)