विद्यापीठ देशात ८७ वे

By Admin | Published: April 5, 2016 12:32 AM2016-04-05T00:32:51+5:302016-04-05T00:47:43+5:30

औरंगाबाद : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने

University is 87th in the country | विद्यापीठ देशात ८७ वे

विद्यापीठ देशात ८७ वे

googlenewsNext


औरंगाबाद : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शंभर गुणवत्तापूर्ण विद्यापीठांमध्ये येण्याचा मान मिळविला असून, विद्यापीठाने ८७ वा क्रमांक पटकावला आहे.
२०१४ मध्ये झालेल्या ‘नॅक’ (नॅशनल अ‍ॅसेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडेशन कौन्सिल) च्या मूल्यांकनात विद्यापीठाने अ दर्जा मिळविला होता. आता देशात पहिल्यांदाच झालेल्या विद्यापीठांच्या क्रमवारीत पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळाल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एनआयआरएफतर्फे सोमवारी देशातील ‘टॉप १००’ विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शंभरपैकी ५०.७ गुण प्राप्त केले.
अध्ययन, अध्यापन प्रक्रिया आणि संशोधन, विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण व महिलांसह विविध वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी केलेले प्रयत्न त्याचप्रमाणे विद्यापीठाची कृतिशीलता या निकषांच्या आधारे क्रमवारी ठरविली गेली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ८७ वा क्रमांक मिळाला. विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे हे यानिमित्ताने नवी दिल्लीला गेले आहेत. पहिल्या शंभरात

Web Title: University is 87th in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.