अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला बॉक्सिंग स्पर्धेसाठी विद्यापीठाचा संघ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 11:50 PM2019-01-24T23:50:16+5:302019-01-24T23:50:46+5:30
उदयपूर येथील आर.जे.एन. विद्यापीठात होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला बॉक्सिंग स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिला संघ रवाना झाला आहे. या स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय स्पर्धांत पदकविजेती कामगिरी करणारी तेजस्विनी जिवरग, शालू हिवराळे, ऐश्वर्या जगताप, साधना जोशी, अमरीन सय्यद, एस. पठाण, ज्योती वाघ, नम्रता देशमुख, अंजली खरात यांचा समावेश आहे.
औरंगाबाद : उदयपूर येथील आर.जे.एन. विद्यापीठात होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला बॉक्सिंग स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिला संघ रवाना झाला आहे. या स्पर्धेत अनेक राज्यस्तरीय स्पर्धांत पदकविजेती कामगिरी करणारी तेजस्विनी जिवरग, शालू हिवराळे, ऐश्वर्या जगताप, साधना जोशी, अमरीन सय्यद, एस. पठाण, ज्योती वाघ, नम्रता देशमुख, अंजली खरात यांचा समावेश आहे. या खेळाडूंना संदीप जगताप, अजय जाधव व लक्ष्मण कोळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संघासोबत प्रशिक्षक म्हणून अजय जाधव व व्यवस्थापक म्हणून लक्ष्मण कोळी हेदेखील रवाना झाले आहेत. खेळाडूंना विद्यापीठाचे कुलगुरु बी.ए. चोपडे, प्रकुलगुरू अशोक तेजनकर, कुलसचिव साधना पांडे, क्रीडा संचालक दयानंद कांबळे, सिनेट सदस्य व शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे, नितीन निरावणे, किरण शूरकांबळे, अभिजित दिख्खत, मनोज शेट्टे आदींनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.