विद्यापीठाला ‘रुसा’चे १२० कोटी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:59 AM2018-01-02T00:59:24+5:302018-01-02T00:59:27+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात १२० कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली. तसेच ‘रुसा’तील एका खरेदीमध्ये गडबड झाल्याचे लक्षात येताच ६० लाख रुपयांचे बिल थांबविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात १२० कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली. तसेच ‘रुसा’तील एका खरेदीमध्ये गडबड झाल्याचे लक्षात येताच ६० लाख रुपयांचे बिल थांबविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानची स्थापना केली आहे. या अभियानांतर्गत देशभरातील विद्यापीठांना निधी देण्यात येत आहे. यात केंद्र सरकार ६०, तर राज्य सरकार ४० टक्के निधी देतात. यासाठी विद्यापीठाला निधीचा प्रस्ताव दाखल करावा लागतो. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाला ‘रुसा’ने १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून विद्यापीठ आणि महाविद्यालयातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याचेही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले. विद्यापीठातील २०० प्राध्यापकांपैकी केवळ ४७ जणांनीच ‘रुसा’ अंतर्गत संशोधनासाठी प्रस्ताव पाठविले. सर्वच प्राध्यापकांनी यात सहभागी होणे आवश्यक होते. मात्र आपल्याकडे स्वत: मिळविण्याऐवजी दुसºयाने मिळविल्यानंतर त्याकडे बोट दाखविणारे अधिक आहेत. आता हौशे, गवसे, नवसे लोक चालणार नाहीत. हिंदी विभागातील प्राध्यापकांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी स्वत: खास प्रयत्न केले. विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रकल्पांना निधी मिळतो. मात्र सामाजिक शास्त्रातील विषयात या तुलनेत मागे पडतात. यामुळे सामाजिक शास्त्रातील विषयांना अधिक निधी मिळावा म्हणूनही विशेष प्रयत्न केल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे म्हणाले.
आॅर्डर एकाची, घेतली दुसºयानेच
विद्यापीठात ‘रुसा’अंतर्गत काही गोष्टींची खरेदी केली होती. यात आॅर्डर एकाने केली. मात्र उपकरणे दुसºयानेच घेतल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या खरेदीत अनियमितता असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. यामुळे तब्बल ६० लाख रुपयांचे बिल थांबविले आहे. या प्रकरणात अंतर्गत पातळीवर वित्त व लेखाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती चौकशी करीत असल्याचेही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी स्पष्ट केले.
नवीन वर्षामध्ये विद्यापीठासमोर सर्वात महत्त्वाचे आव्हान हे ‘नॅक’चे आहे. विद्यापीठ-२०१८ मधील सप्टेंबरमध्ये ‘नॅक’च्या थर्ड सायकलला सामोरे जाणार आहे. ही कठीण परीक्षा असेल. त्यात उत्तीर्ण होणे हेच मुख्य उद्दिष्ट नवीन वर्षात असेल.
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू