विनापरवाना पाणी विक्री
By Admin | Published: July 24, 2016 12:17 AM2016-07-24T00:17:22+5:302016-07-24T00:52:31+5:30
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात ज्यूस विक्रीचा परवाना असताना बिनधास्त विनापरवाना पाण्याच्या बॉटल्स विक्री करणाऱ्या स्टॉलधारकाच्या ‘दबंगगिरी’ला
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात ज्यूस विक्रीचा परवाना असताना बिनधास्त विनापरवाना पाण्याच्या बॉटल्स विक्री करणाऱ्या स्टॉलधारकाच्या ‘दबंगगिरी’ला शनिवारी ‘एसटी’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले. जप्तीची कारवाई करताना स्टॉलधारकासमोर कर्मचाऱ्यांना चक्क नमते घ्यावे लागले. त्यामुळे पाण्याच्या बॉटल्सचे अनेक बॉक्स असताना अवघे दोन बॉक्स जप्त करून त्यांना माघारी परतावे लागले.
मध्यवर्ती बसस्थानकात जवळपास ३० हॉकर्स आणि कॅन्टीन तसेच स्टॉलचे ६ (आस्थापना) परवानाधारक व्यवसाय करतात. कॅन्टीन तसेच अन्य स्टॉल्सचे प्रत्येकी तिघेजण बसस्थानकात फिरून पाण्याच्या बॉटल्स किंवा अन्य खाद्यपदार्थ विक्री करतात. नियमानुसार या आस्थापनांना तीन हॉकर्सची परवानगी आहे; परंतु प्रत्यक्षात अधिक हॉकर्स व्यवसाय करतात. त्यातही भर म्हणजे काही जणांच्या परवान्यावर दुसरेच फेरीवाले व्यवसाय करीत आहे.
तसेच परवाना देताना त्यावर खाद्यपदार्थांची नावे नमूद असतात. परंतु त्याव्यतिरिक्तही खाद्यपदार्थांची सर्रास विक्री केली जात आहे. बसस्थानकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शनिवारी अशांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. स्वच्छतागृहाच्या शेजारी असलेल्या ज्यूसच्या स्टॉलवर विनापरवाना पाण्याच्या बॉटल्सची विक्री होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे येथील पाण्याच्या बॉटल्स जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली.