अवकाळीचा कहर सुरूच, मराठवाड्यात १ हजार हेक्टरला तडाखा

By विकास राऊत | Published: April 22, 2024 12:30 PM2024-04-22T12:30:39+5:302024-04-22T12:31:01+5:30

अवकाळीचा कहर सुरूच असून शनिवारी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.

Unseasonal havoc continues, 1000 hectare affected in Marathwada | अवकाळीचा कहर सुरूच, मराठवाड्यात १ हजार हेक्टरला तडाखा

अवकाळीचा कहर सुरूच, मराठवाड्यात १ हजार हेक्टरला तडाखा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे ११४ गावांतील ३ हजार २२३ शेतकऱ्यांना फटका बसला. विभागातील १ हजार हेक्टरवरील जिरायती, बागायत आणि फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वीज पडून ४ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर १२१ जनावरे दगावली. बीड, लातूर जिल्ह्यांना जास्त तडाखा बसला. ९ ते २० एप्रिलपर्यंत १३ दिवस अवकाळी पावसाने विभागात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. ३२.७ मि.मी. पाऊस १३ दिवसांत झाला. २१ एप्रिलच्या सकाळपर्यंत ३.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.

अवकाळीचा कहर सुरूच असून शनिवारी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याचा फटका ११४ गावांतील ३ हजार २०० शेतकऱ्यांना बसला असून त्यांचे जवळपास १ हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ९ एप्रिलपासून २० एप्रिलपर्यंत वीज पडून १४ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले. लहान-मोठी २७३ जनावरे दगावली, तर ५४४ घरांची पडझड झाली. मराठवाड्यातील एकूण ५९५ गावे बाधित झाली असून १२ हजार ३५० शेतकऱ्यांचे एकूण ६ हजार २५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

२० दिवसांत किती नुकसान?
आतापर्यंत ६ हजार २५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. वीज पडून १० जण जखमी झाले, तर १० जणांचा मृत्यू झाला होता. लहान, मोठे, ओढकाम करणारे असे एकूण १५२ पशुधन दगावले. अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २३७ हेक्टर, जालना ९९०, परभणी ५३९, हिंगोली ३३०, नांदेड ८२०, बीड १६९३, लातूर ३२४, धाराशिव जिल्ह्यात ३२१ हेक्टरवरील बागायती, जिरायती व फळपिकांचे नुकसान झाले होते.

९ ते २० एप्रिलपर्यंत झालेले नुकसान
जिल्हा.............. बाधित गावे............ बाधित शेतकरी संख्या............... नुकसान
छत्रपती संभाजीनगर.......... १२ ....................४४०............................. २३७
जालना ..............            १३३.................... १७३८........................... ९९०.३
परभणी ....................            ३१.............             ५५६ ...................३२८
हिंगोली.............             २४.....................            २९४४.................... ८७५
नांदेड................             ३९...............            ११००.................... ८४०
बीड ..............            १३८............... ३९९६..................... १८७३
लातूर................             १६२.............. ११०२................... ६८८
धाराशिव.............             ५६.......................             ४७४............. ४२४
एकूण................५९५.............. १२३५० .................६२५७

 

Web Title: Unseasonal havoc continues, 1000 hectare affected in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.