आंतरवाली खांडी शिवारात बेमोसमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:06 AM2021-05-05T04:06:06+5:302021-05-05T04:06:06+5:30

पाचोड : यापासून काही अंतरावर असलेल्या आंतरवाली खांडी शिवारात सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. ...

Unseasonal rain in Antarwali Khandi Shivara | आंतरवाली खांडी शिवारात बेमोसमी पाऊस

आंतरवाली खांडी शिवारात बेमोसमी पाऊस

googlenewsNext

पाचोड : यापासून काही अंतरावर असलेल्या आंतरवाली खांडी शिवारात सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या बिगरमोसमी पावसामुळे गावातील काही शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. तर लिंबांचे झाड उन्मळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

सोमवारी दुपारी पाचोड परिसरातील आडगाव जावळे, आंतरवाली खांडी शिवारात ढगाळ वातावरण झाले. सायंकाळी वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस पडला. या पावसामुळे सखाराम हांडे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे सखाराम हांडे यांचा संसारच उघड्यावर पडला. त्याचबरोबर गावातील लहुराव रानुजी कळमकर यांच्या गट नंबर ५२ मधील शेतातील लिंबूच्या बागातील लिंबूचे झाडच उन्मळून पडले. लहुराव कळमकर यांच्या शेतात नुकसान झाले आहे. आडगाव जावळे परिसरातसुद्धा बिगरमोसमी पावसाने हजेरी लावली. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करावे व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी माजी सरपंच अरुण कळमकर यांनी केली.

030521\anil mehetre_img-20210503-wa0030_1.jpg

आंतरवाली खाडी येथील शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने संसार असा उघड्यावर पडला.

Web Title: Unseasonal rain in Antarwali Khandi Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.