ग्रामीण कोरोनाग्रस्त शहरात पोहोचेपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:04 AM2021-04-16T04:04:46+5:302021-04-16T04:04:46+5:30

ऑक्सिजनची पातळी ९० वरून ६० वर यंत्रणा अपुरी : रुग्ण वाचणार कसा?, ग्रामीण भागातील यंत्रणा सक्षम करण्याची तज्ज्ञांची ...

Until we reach the rural corona town | ग्रामीण कोरोनाग्रस्त शहरात पोहोचेपर्यंत

ग्रामीण कोरोनाग्रस्त शहरात पोहोचेपर्यंत

googlenewsNext

ऑक्सिजनची पातळी ९० वरून ६० वर

यंत्रणा अपुरी : रुग्ण वाचणार कसा?, ग्रामीण भागातील यंत्रणा सक्षम करण्याची तज्ज्ञांची अपेक्षा

औरंगाबाद : जिल्ह्यातील एखाद्या खेड्यात एखाद्यास कोरोनाचे निदान झाले आणि त्याला ऑक्सिजनची गरज भासली, तर अनेक कि.मी. अंतर प्रवास करून शहर गाठावे लागत आहे. अशावेळी अनेक रुग्णांची ऑक्सिजनची पातळी ९० वरून ६० वर येते. अनेक रुग्ण रुग्णालयासमोर रुग्णवाहिकेत असतात आणि त्यांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मग रुग्ण वाचणार कसा? त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनावरील उपचाराची सुविधा वाढविण्याची गरज असल्याची अपेक्षा फिजिशियन असोसिएशनने व्यक्त केली.

जिल्ह्यात शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात बुधवारी उच्चांकी ९४७ रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातील एकूण सक्रिय म्हणजे उपचार घेणाऱ्या १५ हजार ८०२ रुग्णांपैकी तब्बल ४५ टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना सरळ शहरात रेफर केले जात असल्याची परिस्थिती आहे. रेफर करताना शहरात बेड उपलब्ध होईल की नाही, याचा कोणताही विचार केला जात नाही. ऑक्सिजनची पातळी कमी झालेल्या रुग्णाची प्रकृती शहर गाठेपर्यंत आणखी खालावते. त्यानंतर रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले तरी फारसा उपयोग होत नाही. केंद्रीय पथकानेही ग्रामीण भागातून रेफर होणाऱ्या रुग्णांच्या परिस्थितीवर बोट ठेवले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तेथेच उपचार मिळेल, अशी व्यवस्था उभी करण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे.

-----

ग्रामीण भागात असे वाढले सक्रिय रुग्ण...

८ एप्रिल- ५,९३५

९ एप्रिल- ५,८७२

१० एप्रिल- ६,३४०

११ एप्रिल- ६,३५२

१२ एप्रिल- ६,५६४

१३ एप्रिल- ६,५७९

१४ एप्रिल- ७,१२६

---

ग्रामीण भागात जम्बो सेंटर उभे करावे

ऑक्सिजनची पातळी ९० असताना खेड्यातील रुग्ण शहरात येतात. इथे येईपर्यंत ऑक्सिजनची पातळी ६० वर येते. मग रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवूनही उपयोग होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तेथेच उपचार मिळायला पाहिजेत. जम्बो सेंटर उभे करून त्यांना उपचाराची सुविधा दिली पाहिजे.

- डॉ. संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशियन असोसिएशन

Web Title: Until we reach the rural corona town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.