सिल्लोडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे थाटात अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:04 AM2021-02-21T04:04:27+5:302021-02-21T04:04:27+5:30
शहरात भव्य असा शिवाजी महाराजांचा चौक असावा असा संकल्प राज्यमंत्री सत्तार यांनी केला होता. त्याच अनुषंगाने शास्त्री कॉलोनीत या ...
शहरात भव्य असा शिवाजी महाराजांचा चौक असावा असा संकल्प राज्यमंत्री सत्तार यांनी केला होता. त्याच अनुषंगाने शास्त्री कॉलोनीत या चौकाचे काम करण्यात आले. काम पूर्ण झाल्याने शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी त्याचे अनावरण झाले. फटाक्यांची आतिषबाजी, आकर्षक विद्युत रोषणाई व जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने शिवभक्तांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, नगराध्यक्षा राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, सभापती अर्जुन गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, सुदर्शन अग्रवाल, न.प. मुख्याधिकारी सैय्यद रफिक आदी उपस्थिती होती.
------- शिवपार्कच्या कामाला एप्रिलमध्ये सुरुवात ----
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून ग्रामविकास विभागअंतर्गत शिवपार्क व भीमपार्क उभारण्यात येणार आहे. एप्रिलमध्ये या कामाला सुरुवात होईल. यासह सिल्लोड शहरातील इतर चौकाचे लवकरच सुशोभीकरणाच्या कामाला प्रारंभ करत आपले शहर स्वच्छ, सुंदर, हरित ठेवण्यासाठी नागरिकांनी सहभागी होवून सहकार्य करावे असे, आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले.
-- कॅप्शन
: सिल्लोड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या अनावरणाप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह इतर पदाधिकारी.