UPSC Exam: ‘युपीएससी’च्या परीक्षेकडे ४० टक्के उमेदवारांची पाठ

By विजय सरवदे | Published: May 29, 2023 02:08 PM2023-05-29T14:08:49+5:302023-05-29T14:09:24+5:30

या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारत सरकारच्या प्रशासकीय व इतर सेवांमध्ये केली जाते.

UPSC Exam: 40% of candidates back for UPSC exam | UPSC Exam: ‘युपीएससी’च्या परीक्षेकडे ४० टक्के उमेदवारांची पाठ

UPSC Exam: ‘युपीएससी’च्या परीक्षेकडे ४० टक्के उमेदवारांची पाठ

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर :केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) रविवारी २८ मे रोजी देशभरात पूर्वपरीक्षेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमधील २५ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेकडे तब्बल ४० टक्के उमेदवारांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले.

सकाळी ९:३० ते ११:३० व दुपारी २.३० ते ४:३० अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. ही देशातील सर्वांत प्रतिष्ठित परीक्षा समजली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात. या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारत सरकारच्या प्रशासकीय व इतर सेवांमध्ये केली जाते. रविवारी झालेल्या पूर्वपरीक्षेसाठी शहरातील २५ केंद्रांवर ८ हजार १४० उमेदवार प्रविष्ठ झाले होते. प्रत्यक्षात मात्र, सकाळच्या सत्रात ४ हजार ८३५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. ३ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे पाठ फिरवली. दुपारच्या सत्रात ४ हजार ७६३ उमेदवार परीक्षेस उपस्थित होते, तर ३ हजार ३५७ उमेदवार गैरहजर राहिले. या परीक्षेत सकाळच्या सत्रात २०० गुणांचे १०० प्रश्न, तर दुपारच्या सत्रात २०० गुणांसाठी ८० प्रश्न होते. दुपारचा पेपर ‘सीसॅट’चा होता.

कडेकोट बंदोबस्त
शहरातील सर्वच केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात ही परीक्षा झाली. महसूल व शिक्षण विभागाचे एकूण १,२०० अधिकारी - कर्मचारी परीक्षेच्या व्यवस्थापनासाठी तैनात होते.

चकवा देणारे पर्याय
सकाळी सामान्य अध्ययनाचा पेपर होता. मात्र, बहुपर्यायी प्रश्नांसाठी चकवा देणारे पर्याय असल्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले. याच पेपरचे गुण निकालासाठी ग्राह्य धरतात व ‘सीसॅट’चे किमान गुण मिळवले तरी चालतात. ‘सीसॅट’चा पेपर पहिल्यांदा तपासतात व त्यात आवश्यक तेवढे गुण मिळाले, तरच सामान्य अध्ययनचा पेपर तपासला जातो.

Web Title: UPSC Exam: 40% of candidates back for UPSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.