'अर्जंट ब्रेक'च बेतले जीवावर; अपघातात दुचाकीस्वार शाळकरी मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 06:40 PM2019-06-21T18:40:44+5:302019-06-21T18:43:16+5:30

समोरच्या वाहनावर धडकेपासून वाचण्यासाठी लावले 'अर्जंट ब्रेक'

'urgent breaks causes death; Two-wheeler rider school boy dies in accident at Aurangabad | 'अर्जंट ब्रेक'च बेतले जीवावर; अपघातात दुचाकीस्वार शाळकरी मुलाचा मृत्यू

'अर्जंट ब्रेक'च बेतले जीवावर; अपघातात दुचाकीस्वार शाळकरी मुलाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देमित्रांसोबत जात होते विद्यापीठ परिसरातबसने अचानक वेग कमी केला

औरंगाबाद : चार मित्र दोन दुचाकीने विद्यापीठात जात असताना समोरील वाहनाने अचानक वेग कमी केल्याने जोरदार ब्रेक लावल्यानंतर दुचाकी उलटून झालेल्या अपघातात दहावीत शिकणारा १६ वर्षीय मुलगा ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास लोखंडी पुल ते महावीर चौकदरम्यान घडला.या अपघाताची नोंद छावणी ठाण्यात करण्यात आली.

उर्वेश सुभाष जुमडे (रा.राजमाता जिजाऊ नगर, मुकुंदवाडी परिसर) असे मृत मुलाचे नाव आहे. याविषयी छावणी पोलिसांनी सांगितले की, उर्वेश आणि त्याचा मित्र जयेश नरवडे (वय १६,रा. जयभवानीनगर),  प्रतीक सुनील आठवले(रा. सिडको एन-४) आणि आकाश उद्धव सोनार (वय १६,रा.जयभवानीनगर) हे सिडको एन-३ मधील सेंट मीरा इंग्लीश स्कुलमध्ये दहावीचे विद्यार्थी आहेत. आज सकाळी उर्वेश आणि जयेश एका दुचाकीने तर प्रतिक आणि आकाश हे दुसऱ्या मोटारसायकलने नाश्ता करण्यासाठी विद्यापीठ परिसरातील एका हॉटेलवर जात होते.

वेगवेगळ्या दुचाकीने गप्पा मारत ते महावीर चौकाकडून छावणीतील लोखंडी पुलाकडे जात होते. तेथील चारचाकी वाहनाच्या दालनासमोर अचानक समोरील वेगातील बसने आणि मित्राने दुचाकीचा वेग कमी केला. आपण दुचाकीला धडकू या भितीपोटी उर्वेशने वेगातील दुचाकीला ब्रेक लावले आणि त्याची दुचाकी उलटली. या घटनेत उर्वेशच्या डोक्याला गंभीर दुखपात होऊन तो दुचाकीखाली दबला तर सोबतचा मित्र हा बाजूला पडल्याने त्यास कमी मार लागला. यावेळी वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड हे कार मधून येथून जात होते. त्यांनी गाडी थांबवत उर्वेशला आणि त्याच्या मित्राला घाटीत दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अपघात विभागातील डॉक्टरांनी उर्वेशला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

Web Title: 'urgent breaks causes death; Two-wheeler rider school boy dies in accident at Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.