खुलताबादचा उरुस २६ नोव्हेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:32 AM2017-11-15T00:32:35+5:302017-11-15T00:32:44+5:30

येथील हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन उर्फ जर जरी जर बक्ष यांच्या ७३१ व्या उससास २६ नोव्हेंबरपासून सुरूवात होत असून प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

 Urs of Khulatabad, from 26th November | खुलताबादचा उरुस २६ नोव्हेंबरपासून

खुलताबादचा उरुस २६ नोव्हेंबरपासून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : येथील हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन उर्फ जर जरी जर बक्ष यांच्या ७३१ व्या उससास २६ नोव्हेंबरपासून सुरूवात होत असून प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील सर्वात मोठा उरूस म्हणून या उरसाची ख्याती आहे. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता संदल मिरवणूक निघेल. दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच कुस्त्यांची दंगल, मुशायरा, कवाली आदी कार्यक्रम होणार आहेत. उरुसानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर विविध दुकाने व मनोरंजनाची साधने आली असून मौत का कुआं, रहाटपाळणे लावण्याचे काम सुरू आहे.
उरसानिमित्त दर्गावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उरसाच्या तयारीसाठी प्रशासनाने आतापर्यंत चार- पाच बैठका घेतल्या असून भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, यासाठी उर्स व्यवस्था समितीचे अध्यक्ष तहसीलदार अरूण जºहाड, सचिव मुख्याधिकारी सौरभ कटीयार, उपाध्यक्ष मुनीबोद्दीन मुजीबोद्दीन, नगराध्यक्ष अ‍ॅड. एस.एम. कमर, उर्स व्यवस्था समितीचे सदस्य अ‍ॅड. कैसरोद्दीन, महंमद नईम बक्ष, जियाओद्दीन सिजाओद्दीन, न.प. उर्स प्रशासन विभाग प्रकाश दाभाडे, एस.बी. वाघ, शेख मुक्तार, जितेंद्र बोचरे, अप्पाराव देवकर, जे. के.चौधरी, अंकुश भराड आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title:  Urs of Khulatabad, from 26th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.