संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 07:22 PM2019-01-11T19:22:48+5:302019-01-11T19:23:12+5:30

भारतात संशोधनासाठी मिळणाऱ्या एकू ण अनुदानापैकी ९० टक्के अनुदान केवळ परदेशात तयार झालेली साधने आयात करण्यासाठी खर्च होते. यातून निर्माण झालेल्या संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर यांनी केले.

 Use of research should be used for actual production | संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी व्हावा

संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी व्हावा

googlenewsNext

औरंगाबाद : भारतात संशोधनासाठी मिळणाऱ्या एकू ण अनुदानापैकी ९० टक्के अनुदान केवळ परदेशात तयार झालेली साधने आयात करण्यासाठी खर्च होते. यातून निर्माण झालेल्या संशोधनाचा उपयोग प्रत्यक्ष उत्पादनासाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर यांनी केले.


देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कम्प्युटिंग इन इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ या विषयावर चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन अमेरिकेतील नामांकित एमआयआर लॅबचे संचालक अजित अब्राहम यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू डॉ. व्ही. जी. गायकर, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ़ एस़ पी़ यावलकर, डॉ़ एस़ बी़ देवसारकर, विवेक भोसले, संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांची उपस्थिती होती. डॉ. गायकर म्हणाले की, भारताच्या आर्थिक विकासास हातभार लावण्यासाठी उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. हे उत्पादन दर्जेदार असावे, यासाठी संशोधकांच्या संशोधनाचा वापर उत्पादनाच्या वेळी झाला पाहिजे. त्याशिवाय संशोधनाला चांगले दिवस येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. यावलकर म्हणाले, संशोधन हे शिक्षण क्षेत्रातून उद्योगाकडे गेले पाहिजे, त्यासाठी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे अपेक्षित आहे. अशा परिषदांमधून या प्रक्रियेला चालना मिळते, असेही त्यांनी सांगितले. उद्योजक विवेक भोसले म्हणाले, संशोधन संस्कृती ही परिषदेपुरतीच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे. यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यात येणाºया विविध समस्यांना विद्यार्थ्यांसमोर चर्चेला घेऊन त्या सोडविण्यासाठी संशोधन केले पाहिजे. याला अर्थपूर्ण जोड असली पाहिजे.

तर त्या संशोधनाचे व्यावसायिक स्वरुपात रुपांतर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी महाविद्यालयाने राबविलेल्या विविध विद्यार्थी उपयोगी योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. गजेंद्र गंधे, डॉ. ब्रिजेश अय्यर, उपप्राचार्य प्रा. संजय कल्याणकर, डॉ. सत्यवान धोंडगे, प्रा. प्रकाश तौर, डॉ़ राजेश औटी, प्रा़ उमेश पाटील, डॉ़ सुनील शिंदे, प्रा. रुपेश रेब्बा यांनी परिश्रम घेतले.

Web Title:  Use of research should be used for actual production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.