सांडपाण्याचा उपयोग सुुशोभिकरणासाठी
By Admin | Published: April 25, 2016 11:08 PM2016-04-25T23:08:47+5:302016-04-25T23:39:23+5:30
बीड : हॉटेल व्यवसायात दिवसाकाठी हजारो लिटर पाण्याची आवश्यकता लागते. तेवढ्याच प्रमाणात सांडपाणीही वाया जाते. मात्र, सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता
बीड : हॉटेल व्यवसायात दिवसाकाठी हजारो लिटर पाण्याची आवश्यकता लागते. तेवढ्याच प्रमाणात सांडपाणीही वाया जाते. मात्र, सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता राजेश क्षीरसागर यांनी हॉटेलच्या सांडपाण्यातून झाडांचे सुुशोभिकरण केले आहे. त्यामुळे पाण्याचा सदुपयोग झाला आहे.
पूर्वी ग्राहकांच्या सेवेसाठी सातत्याने पाण्याचे ग्लास भरून ठेवले जात असत. पाणीटंचाईमुळे नियमात बदल करून दीड महिन्यांपासून ग्राहकांनी मागितले तरच आणि लागेल तेवढेच पाणी दिले जात आहे. त्यामुळे पाणी बचत होऊ लागली आहे.
नळाचे पाणी कमी झाल्याने संपूर्ण व्यवसाय बोअरच्या पाण्यावरच अवलंबून आहे. क्षार विरहीत पाणी ग्राहकांना मिळावे म्हणून क्षीरसागर यांनी पाणी टाकीलाच वॉटर शार्पनर यंत्र बसिवले आहे. त्यामुळे शुद्धतेबरोबर ग्राहकांना थंड पाण्याचा स्वाद घेता येत आहे.
सकाळ- सायंकाळच्या वेळी हॉटेल परिसरात मारण्यात येणाऱ्या पाण्यावरही निर्बंध लादण्यात आले आहेत. रहदारी लक्षात घेता पाणपोई सुरू करण्याचा क्षीरसागरांचा मानस आहे. (प्रतिनिधी)