अधिसभा, विद्या परिषदेवर ‘उत्कर्ष’चे वर्चस्व; चुरसीच्या लढाईत दिग्गजांचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 05:26 PM2022-12-14T17:26:44+5:302022-12-14T17:26:55+5:30
विद्यापीठ विकास मंचचा प्रत्येक गटात एक विजय, काही जागांवर काट्याची टक्कर
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत उत्कर्ष पॅनलने बाजी मारून पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. विद्यापीठ विकास मंचचा प्रत्येक गटात एक सदस्य निवडून आला. परिवर्तन आणि स्वाभिमानी पॅनलनेही एक-एक जागा जिंकत खाते उघडले. अनेक जुन्या आणि दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले.
मंगळवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाली. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, सचिव भगवान साखळे, निवडणूक समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड व सदस्य उपस्थित होते. प्राचार्य गटात खुल्या प्रवर्गातून डॉ. बाबासाहेब गोरे (१५ मते), डॉ. भारत खंदारे (१४), डॉ. विश्वास कंधारे व डॉ. संजय लिंबराज कोरेकर हे १३ मतांचा कोटा पूर्ण करून विजयी झाले. डॉ. दादा शेंगुळे हे ९ मते घेऊन (बिलो कोटा) विजयी घोषित झाले. प्राचार्य मागास प्रवर्गातून डॉ. गौतम पाटील (अनुसूचित जाती प्रवर्ग-४६ मते), डॉ. गोवर्धन सानप (व्हीजेएनटी - ५२ मते), डॉ. हरिदास विधाते (इतर मागास प्रवर्ग- ५० मते) हे विजयी झाले. डॉ. शिवदास सिरसाठ बिनविरोध आले असून, महिला गटातील जागा रिक्त आहे. विद्यापीठ शिक्षक गटातून डॉ. भास्कर साठे (खुला प्रवर्ग ६० मते), डॉ. वैशाली खापर्डे (महिला ६९ मते), डॉ. चंद्रकांत नामदेवराव कोकाटे (अनुसूचित जमाती ६५ मते) हे निवडून आले.
संस्थाचालक गटात खुल्या प्रवर्गातून बसवराज मंगरुळे (३५ मते), डॉ. मेहर पाथ्रीकर (३३ मते), हे कोटा पूर्ण करून विजयी झाले. गोविंद देशमुख (३२ मते) व अशिलेष मोरे हे ’बिलो काटो’ (२८ मते) विजयी घोषित करण्यात आले. संस्थाचालक महिला प्रवर्गातून अर्चना चव्हाण (अर्चना रमेश आडसकर) व नितीन जाधव (अनुसूचित जाती प्रवर्ग) हे दोघे जण आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
संजय निंबाळकर, सतीश दांडगे पराभूत
सन १९७४, १९९४ आणि २०१६ या तिन्ही वेळच्या विद्यापीठ कायद्याच्या कार्यकाळात काम करणारे संजय निंबाळकर यांचा संस्थाचालक गटातून पराभव झाला. बरोबरीची मते मिळाली, मात्र अश्लेष मोरे यांनी प्रथम पसंतीची अधिक मते मिळवित विजय मिळविला. विद्यापीठ शिक्षक गटातून सतीश दांडगे तिसऱ्यांदा निवडून येण्यात अपयशी ठरले. तर विद्यापीठ शिक्षक गटातून भास्कर साठे, चंद्रकांत कोकाटे आणि वैशाली खापर्डे हे सदस्य पहिल्यांदा निवडून आले. परिवर्तन पॅनलचे विलास खंदारे पराभूत झाले. मात्र त्यांच्या पॅनलमधील उमाकांत राठोड हे निवडून आले. त्यामुळे ‘गड गेला, पण गडी आला’ अशी चर्चा सुरू होती.
अधिसभा गट, प्रवर्गनिहाय जागा , उमेदवार व मिळालेली मते.
प्राचार्य - १० जागा (५ खुला प्रवर्ग, ५ राखीव)
विजयी उमेदवार :
डॉ. बाबासाहेब गोरे - १५
डॉ. विश्चास कंधारे - १३
डॉ. भारत खंदारे- १४
डॉ. संजय कोरेकर - १३
डॉ. दादा शेंगुळे -९
पराभूत उमेदवार
डॉ. गणेश अग्निहोत्री - ८ मते
डॉ. दत्तात्रय वाघ ४
डॉ. राजकुमार मस्के -१
अनुसूचित जमाती प्रवर्ग
डॉ. शिवदास शिरसाठ - बिनविरोध
अनुसूचित जाती प्रवर्ग
डॉ. गौतम पाटील (विजयी)- ४६
डॉ. राजकुमार मस्के - ३१
भटके विमुक्त जाती-जमाती प्रवर्ग
डॉ. गोवर्धन सानप (विजयी)- ५२
डॉ. राजेंद्र परदेशी - २१
इतर मागास प्रवर्ग
डॉ. हरिदास विधाते (विजयी)- ५०
डॉ. शहाजहान मनेर- २४
महिला प्रवर्ग - रिक्त
विद्यापीठ शिक्षक - ३ जागा
खुला प्रवर्ग-
डॉ. भास्कर साठे (विजयी)- ६०
डॉ. सतीश दांडगे- ३३
डॉ. संजय साळुंके - ४२
डॉ. अशोक पवार-१
अनुसूचित जाती प्रवर्ग
डॉ. चंद्रकांत कोकाटे (विजयी)-६५मते
डॉ. गोपीचंद धरणे - ४२,
डॉ. भगवान गव्हाडे-१५
महिला प्रवर्ग -
डॉ. वैशाली खापर्डे (विजयी) - ६९ मते
डॉ. फराह गौरी नाझ- ५२
संस्थाचालक- ४ जागा
विजयी उमेदवार -
बसवराज मंगरुळे-३५
डॉ. मेहेर पाथ्रीकर- ३३
गोविंद देशमुख-३२
अश्लेष मोरे-२८
पराभूत -
संजय निंबाळकर-२८ मते
विनायक चोथे-१५,
किशोर हंबर्डे-१७
महाविद्यालयीन शिक्षक गट
महिला : डाॅ. कल्पना हनुमंतराव घार्गे (१०३५)
एससी : डाॅ. संजय कांबळे ( १०५६)
एसटी : डाॅ. सतीश गावित (१२८०)
ओबीसी : रविकिरण सावंत (९९४)
व्हीजेएनटी : उमाकांत राठोड (९६०)
विद्या परिषदेचा निकाल
मानव्य विद्या शाखा :
खुला गट - डॉ. राजेश करपे (१ हजार ४८४ मते)
व्हीजेएनटी प्रवर्ग : डॉ. व्यंकटेश लांब (१ हजार २५२ मते)
विज्ञान विद्या शाखा :
महिला प्रवर्ग - डॉ. रेखा गुळवे (१ हजार २७८ मते)
अनुसूचित जाती प्रवर्ग : डॉ. वैभव मुरुमकर (१ हजार २२७ मते)
वाणिज्य विद्या शाखा :
डॉ. राजेश लहाने (१ हजार २९२ मते)
आंतरविद्या शाखा : खुला प्रवर्ग.
डॉ. प्रभाकर लहूराव कराड (१ हजार १८२ मते)
३ महिन्यांपासून मेहनत
विद्यापीठ प्रशासन, कुलसचिव, निवडणूक समिती, निवडणूक विभाग आदींनी गेल्या ३ महिन्यांपासून मेहनत घेतली. सर्व प्रक्रिया नियोजनबद्ध, पारदर्शक आणि शांततेत पार पडली.
- डाॅ. प्रमोद येवले, कुलगुरू