रिक्त पदांमुळे कामगार कार्यालयाला घरघर
By Admin | Published: January 17, 2015 11:54 PM2015-01-17T23:54:37+5:302015-01-18T00:30:59+5:30
बीड : येथील जिल्हा सहकारी कामगार कार्यालयाला पुरेसे कर्मचारी नसल्याने नोंदणी करण्यासाठी आलेल्या कामगारांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत,
बीड : येथील जिल्हा सहकारी कामगार कार्यालयाला पुरेसे कर्मचारी नसल्याने नोंदणी करण्यासाठी आलेल्या कामगारांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत, असे जिल्हा बिल्डींग संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले़ या कार्यालयातील १५ पैकी तब्बल १२ पदे रिक्त आहेत़
शहरातील शाहूनगर भागात सहकारी कामगार कार्यालय आहे़ या ठिकाणी कामगरांची नोंदणी करण्याचे काम केले जाते़ मात्र या कार्यालयाला मागील दोन वर्षांपासून रिक्त पदांची घरघर लागल्याने कामगारांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी आहेत़
अशी आहेत मंजूर पदे
बीड कार्यालयासाठी जिल्हा कामगार अधिकारी, मिनिमम वेजेस इन्स्पेक्टर (किमान वेतन अधिकारी) यांची सहा पदे तर शॉप इन्स्पेक्टर (दुकान निरीक्षक) चे एक पद, क्लार्क (लिपीक) ची दोन आदी पदे शासनाने मंजूर केलेली आहेत़ पैकी जिल्हा कामगार अधिकारी हे पद भरलेले आहे़
मिनिमम वेजेस इन्स्पेक्टर पदाच्या सहा जागा गेल्या सात वर्षांपासून रिक्त आहेत तर शॉप इन्स्पेक्टरचे एक पद डिसेंबर २०११ पासून रिक्त आहे़ क्लार्क पदाच्या दोन्ही जागा आॅगस्ट २०१२ पासून रिक्त आहेत़ शिपाई पदाच्या दोन जागा जून २०१४ पासून रिक्त आहेत़ अंबाजोगाईसाठी शॉप इन्स्पेक्टरचे एक पद, क्लार्कचे एक तर शिपायाचे एक पद अशी तीन पदे मंजूर आहेत़ तेथे गेल्या सहा महिन्यांपासून शिपायाचे पद रिक्त आहे़ त्यामुळे कार्यालयातील छोट्यातली छोटी कामेही शॉप इन्स्पेक्टर व क्लार्क यांनाच करावी लागतात़
बीड येथील कार्यालयाबबात असलेल्या रिक्त पदाबाबंत वरिष्ठांना कळविले आहे़ सूचना दिल्यानंतर रिक्त पदे भरू, असे कामगार अधिकारी युवराज पडियाल म्हणाले़ (प्रतिनिधी)