शहरातील खासगी रुग्णालयात १८ ते ४५ वयोगटांसाठी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:04 AM2021-05-25T04:04:41+5:302021-05-25T04:04:41+5:30
शहरात १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्व व्यक्तींच्या मोफत लसीकरणाला सुरूवात झाली. महापालिकेने शहरातील ११५ केंद्रांवर ही मोहीम हाती घेतली ...
शहरात १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्व व्यक्तींच्या मोफत लसीकरणाला सुरूवात झाली. महापालिकेने शहरातील ११५ केंद्रांवर ही मोहीम हाती घेतली होती. लसींचा साठा विचारात घेऊन शासनाने १० मेपासून १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण थांबविण्याचे आदेश दिले. तेव्हापासून केवळ ४५ वर्षांवरील व्यक्तींचेच लसीकरण सुरू आहे. परंतु सोमवारी शहरातील एका खासगी रुग्णालयात १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले. महापालिकेच्या डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, एका खासगी रुग्णालयाने थेट कंपनीकडून लस खरेदी केली आहे. त्यानुसार ते लसीकरण करीत आहेत. त्यासाठीही कोविन ॲपवरून नोंदणी करूनच लस द्यावी, असे आदेश आहेत. तूर्तास महापालिकेच्या केंद्रांवर केवळ ४५ वर्षांपुढील व्यक्तींचेच लसीकरण सुरू आहे. शासनाकडून आदेश आल्यानंतर सरकारी केंद्रांवरही १८ वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात होईल.