वैजापुरात ३३ कोरोना योद्ध्यांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:04 AM2021-01-17T04:04:41+5:302021-01-17T04:04:41+5:30
वैजापुर : संपूर्ण देशाला प्रतीक्षा असलेल्या कोरोना लसीकरणाला शनिवारी सुरुवात झाली. उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने मौलाना आझाद विद्यालयात फ्रंटलाईन योद्धा ...
वैजापुर : संपूर्ण देशाला प्रतीक्षा असलेल्या कोरोना लसीकरणाला शनिवारी सुरुवात झाली. उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने मौलाना आझाद विद्यालयात फ्रंटलाईन योद्धा म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस अशा ३३ योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे दिवसभरात शंभर योद्ध्यांना लसीकरणाचे उद्दिष्ट होते, मात्र, केवळ ३३ जणांनाच लस देण्यात आली.
यावेळी आ. रमेश पा. बोरनारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, जि. प. आरोग्य सभापती अविनाश गलांडे, उपनगराध्यक्ष साबेरखान, उपजिल्हाधिकारी माणिक आहेर, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गजानन टारपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरुनाथ इंदूरकर, शहरप्रमुख राजेंद्र साळुंके,जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडिरामसिंह राजपूत यांची उपस्थिती होती.
वैजापुरातील पहिले पाच लाभार्थी म्हणून डॉ. आशिष पाटणी व नर्समध्ये मंगला वाघ, मनीषा जाधव, अर्चना वाघ, ऊर्मिला जाधव यांना लसीकरण करण्यात आले. यावेळी लसीकरण अधिकारी डॉ. मनीषा गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. लसीकरण झालेल्या लोकांना अर्धा तास विश्रांती कक्षात थांबविण्यात आले.
अशी होती लसीकरण केंद्रावरील रचना
या लसीकरणाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावरच पोलीस कॉन्स्टेबल मनोज कुलकर्णी हे नोंदणी विभागावर लक्ष ठेवून होते. मास्क देणे, सॉनिटाईज करणे. स्वागतकक्षात थर्मल गणद्वारे लाभार्थीचे तापमान व ऑक्सिजन बघणे तर तिसऱ्या अधिकाऱ्यांनी लाभार्थी असलेल्या यादीप्रमाणे नोंद घेऊन त्यांना लसीकरणासाठी कक्षात पाठविणे, अशी रचना केलेली होती. डॉ. गजानन टारपे, लक्ष्मीकांत दुबे, रवी विणकरे, नर्स वैशाली टाक, अरुणा सोनवणे आदींनी या लसीकरणावर विशेष लक्ष ठेवले होते.
फोटो कॅप्शन : लसीकरण करून घेताना डॉ. आशिष पाटणी.