शहरात पाच ठिकाणी राबविणार लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:05 AM2021-01-13T04:05:21+5:302021-01-13T04:05:21+5:30
चार टप्प्यांत ही मोहीम राबविली जाणार असून, पहिल्या टप्प्यात शासकीयसह खासगी रुग्णालयांतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लसीच्या दोन मात्रा देण्यात ...
चार टप्प्यांत ही मोहीम राबविली जाणार असून, पहिल्या टप्प्यात शासकीयसह खासगी रुग्णालयांतील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लसीच्या दोन मात्रा देण्यात येणार आहे. त्याकरिता शहरातील आरोग्य कर्मचाऱ्यांची महापालिकेच्या नियंत्रण कक्षात नाव नोंदणी केली जात आहे. कोरोना लसीकरण सुरू झाल्यास एकाच ठिकाणी शहरात तीन लाख लस साठवणूक करता येईल अशी व्यवस्था उभी करण्यात आली आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने पाच ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली आहे. यात भीमनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सिडको एन ११ (ड्राय रन हॉस्पिटल), सादात नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सिल्कमिल्क कॉलनी हॉस्पिटल, बन्सीलाल नगर हॉस्पिटलचा समावेश आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. ९) लसीकरणाच्या सज्जतेचा आढावा घेतला. कोविड लसीकरणासाठी राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या तयारीसह देशातील कोविड-१९ च्या लसीकरणाचा आढावा उच्चस्तरीय बैठकीत घेतला. या बैठकीस कॅबिनेट सचिव, पंतप्रधान आरोग्य सचिवांचे प्रधानद सचिव आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आगामी काळात मकर संक्रांती, लोहारी, पोंगल, माघ, बिहू, आदी सण येत असल्याने १६ जानेवारीपासून लसीकरण माेहीम सुरू करण्याचे सांगितले आहे.