बजाजनगरात महिला व ज्येष्ठांसाठी लसीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:04 AM2021-07-21T04:04:47+5:302021-07-21T04:04:47+5:30
बजाजनगर व वाळूजमहानगर परिसरात कोविड लसीकरणासाठी दररोज गर्दी उसळत असल्याने, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गर्दीमुळे महिला ...
बजाजनगर व वाळूजमहानगर परिसरात कोविड लसीकरणासाठी दररोज गर्दी उसळत असल्याने, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गर्दीमुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांची ओढाताण सुरू असल्याने, नारीशक्ती महिला स्वयं सहायता ग्रामसंघाच्या अध्यक्षा तथा शिवसेना शाखा संघटक रूपाली शुक्ला यांनी दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संग्राम बामणे, माजी खा.चंद्रकात खैरे यांच्याकडे लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. यामुळे बजाजनगरातील मोनार्च किड्स स्कूलमध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.
या लसीकरण केंद्राचे उद्घाटन रूपाली शुक्ला, मुख्याध्यापिका अश्विनी लंके, अश्विनी वराडे, स्वाती जाधव, रेश्मा निंबाळकर, वैशाली माळी, भाग्यश्री जाधव, गीतांजली जाधव, संगिता वाघमारे, वैशाली माळी, प्रतिभा साळवे, राजू शुक्ला, अश्विनी आरड, वंदना वावळे, आरोग्यसेवक रमेश नेव्हाळ, आरोग्यसेविका बेबी शिंदे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. पहिल्या दिवशी ११० जणांचे लसीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात येथे ५०० जणांचे लसीकरण केले जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संग्राम बामणे यांनी सांगितले.
फोटो ओळ- बजाजनगरात महिला व ज्येष्ठ नागरिकासाठी लसीकरण केंद्राच्या उद्घाटन व लसीकरण प्रसंगी घेतलेले छायाचित्र.
------------