आजपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस,थेट पुणे गाठून मिळविले २ लाख डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:04 AM2021-04-01T04:04:56+5:302021-04-01T04:04:56+5:30

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ६० वर्षांवरील नागरिक आणि व्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना आतापर्यंत लस देण्यात येत होती; मात्र ...

Vaccine for all over 45 years from today, 2 lakh doses obtained directly from Pune | आजपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस,थेट पुणे गाठून मिळविले २ लाख डोस

आजपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस,थेट पुणे गाठून मिळविले २ लाख डोस

googlenewsNext

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स, ६० वर्षांवरील नागरिक आणि व्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना आतापर्यंत लस देण्यात येत होती; मात्र आता गुरुवारपासून ४५ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. या वयोगटातील किमान ५ लाख लोकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून लसींची नुसती प्रतीक्षाच करावी लागत होती. शहरात दररोज २ हजार नागरिकांना लस देण्यात येत आहे; परंतु महापालिकेकडे केवळ ४ हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. हा साठा दोन दिवस पुरेल एवढाच आहे. लसींचा पुरवठा न झाल्यास दोन दिवसांनंतर लसीकरणाची मेगा मोहीम संकटात सापडण्याची भीती होती; पण या मोहिमेच्या एक दिवसआधी लसी मिळाल्या. या लसी सकाळपर्यंत शहरात दाखल होणार आहेत. फार्मासिस्ट संजय भिवसने यांनी लसी आणण्यासाठी परिश्रम घेतले. आरोग्य उपसंचालक कार्यालयास १ लाख ९२ हजार लसीचे डोस मिळाले आहेत, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे यांनी दिली.

Web Title: Vaccine for all over 45 years from today, 2 lakh doses obtained directly from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.