वैजापुरात डॉक्टरची गोळी झाडून आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 08:51 PM2018-01-05T20:51:45+5:302018-01-05T20:52:38+5:30
शहरातील आनंद मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मधे कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने आपल्या राहत्या घरी शुक्रवारी दुपारी स्वत:वर गावठी कट्याने गोळी झाडून आत्महत्या केली. डॉ.संजय कुमार उर्फ( यश ) विनोद ठेंभरे (३०)असे मृत डॉक्टरचे नाव आहे.
वैजापुर (औरंगाबाद ) : शहरातील आनंद मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मधे कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने आपल्या राहत्या घरी शुक्रवारी दुपारी स्वत:वर गावठी कट्याने गोळी झाडून आत्महत्या केली. डॉ.संजय कुमार उर्फ( यश ) विनोद ठेंभरे (३०)असे मृत डॉक्टरचे नाव आहे.
गोंदिया जिल्यातील रहिवासी असलेला डॉ.संजय मागील चार वर्षापासून वैजापुर शहरातील फुलेवाडी रोडवर असलेल्या डॉ.अमोल अन्नदाते यांच्या आनंद मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मधे बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत होते.शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यन्त आपल्या दवाखान्यात होते.त्यानंतर त्यांनी दवाखान्या समोरच असलेल्या आपल्या राहत्या खोलीत गावठी कट्याने गोळी झाडून आत्महत्या केली.दुपारी तिन वाजल्या नंतरही डॉक्टर फोन रिसिव्ह करत नसल्याने कंपाउडर त्यांच्या घरी गेले असता डॉ.संजयने आपल्या गावठी कट्याने स्वत:वर गोळी मारून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
डॉ.संजयच्या आत्महत्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी वैजापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार,पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, सपोनि रामहरी जाधव, प्रतापसिंह बहुरे,व संजय घुगे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आत्महत्येच्या कारणाचा तपास सुरू आहे.