वैद्यनाथ मंदिराची अधीक्षकांकडून पाहणी
By Admin | Published: February 21, 2017 10:19 PM2017-02-21T22:19:18+5:302017-02-21T22:22:54+5:30
परळी : महाशिवरात्रीनिमित्त येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथ मंदिराची मंगळवारी अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाहणी केली.
परळी : महाशिवरात्रीनिमित्त येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथ मंदिराची मंगळवारी अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला.
महाशिवरात्रीला वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दूरदूरहून भाविक हजेरी लावतात. राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातून येथे भाविकांची गर्दी असते. दर्शन सुरळीतपणे घेता यावे व भाविकांना सुरक्षेसंदर्भात कुठलीही अडचण भासू नये, या अनुषंगाने उपाययोजना सुरु आहेत. अधीक्षक श्रीधर यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांच्याशी चर्चाही केली. त्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी अप्पर अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, सहायक अधीक्षक विशाल आनंद, शहर ठाण्याचे निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण चाटे, वाहतूक शाखेचे निरीक्षक सोपानराव निघोट आदी उपस्थित होते. यावेळी श्रीधर यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षेसंदर्भात सूचना केल्या. (वार्ताहर)