वैजापूर-श्रीरामपूर मार्ग पुरामुळे झाला ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:49 AM2017-10-11T00:49:54+5:302017-10-11T00:49:54+5:30

पूरामुळे वैजापूर-श्रीरामपूर मार्गावरील वाहतूक मंगळवारी (दि.१०) रात्री उशिरापर्यंत ठप्प होती.

Vaijapur-Shrirampur road closed due to flood | वैजापूर-श्रीरामपूर मार्ग पुरामुळे झाला ठप्प

वैजापूर-श्रीरामपूर मार्ग पुरामुळे झाला ठप्प

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पुणतांबा गावाजवळच्या डोणगाव (ता.वैजापूर) पुलावरून गोदावरीचे पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे डोणगाव येथील नागरिकांना पुणतांबा येथे जाण्यास अडचण होत आहे. या पूरामुळे वैजापूर-श्रीरामपूर मार्गावरील वाहतूक मंगळवारी (दि.१०) रात्री उशिरापर्यंत ठप्प होती.
वैजापूर तालुक्यातील गोदावरी काठावरचे डोणगाव हे गाव पुणतांब्याजवळ आहे. पुणतांबा व श्रीरामपूर ही नगर जिल्ह्यातील गावे डोणगावच्या नागरिकांना सोयीची व जवळची असल्याने तेथील विद्यार्थी शाळा व कॉलेजसाठी तिकडे जातात. मात्र, पुणतांब्याकडे जाणाºया पुलावर जोरदार पावसामुळे पाणी आल्याने दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही.
परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे डोणगाव येथील शेतकरी धनंजय धोर्डे यांनी सांगितले. परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्यास डोणगावसह अन्य गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
सिल्लोडमध्ये सर्वदूर मध्यम पाऊस
सिल्लोड : सिल्लोड शहर व तालुक्यातील सोमवारी आणि मंगळवारी मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे मका, सोयाबीन, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले.
तालुक्यातील गोळेगाव, भराडी, घाटनांद्रा, अंभई, अजिंठा, शिवना, निल्लोड, केळगाव, सारोळा, उंडणगाव, पालोद, बनकीन्होळा सर्कल मध्ये सोमवारी व मंगळवारी कुठे मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे मका, सोयाबीन, कापसाचे नुकसान झाले.सिल्लोड तालुक्यात सोमवारी (दि.९)८ मि.मी. पावसाची नोंद झाली. गोळेगाव मंडळात २३ तर अंभई मंडळात १४ मि.मी पावसाची नोंद झाली. तर मंगळवारीही (दि.१०) बºयाच ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
तालुक्यातील आधारवाडी-कोºहाळा भागात जोरदार पाऊस झाल्याने सिल्लोड शहराला पाणी पुरवठा करणाºया खेळणा मध्यम प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाली आहे. तालुक्यातील अजिंठा, अंधारी मध्यम प्रकल्प, खेलना प्रकल्पात अजूनही मृत साठा आहे.
बाजारसावंगीत जोरदार पाऊस
बाजारसावंगी : परिसरात मंगळवारी (दि.१०) ४ वाजता जोरदार पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी बाजारसावंगीसह येसगाव, शेलगाव, जानेफळ, ममुराबादवाडी, लोणी, बोडखा, कनकशिळ, रेल, इंदापूर, झरी, वडगाव परिसरात दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास जवळपास दीड तास पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मका, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका बसला. शेतक-यांनी परिसरात बहुतांश ठिकाणी मक्याची सोंगणी केली होती. मात्र, पावसामुळे मक्याचे प्रचंड नुकसान झाले. तसेच वेचणीला आलेला कापूस भिजल्याने शेतक-यांच्या अडचणीत भर पडली. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

Web Title: Vaijapur-Shrirampur road closed due to flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.