वैजापुरात ‘एक का सौ’

By Admin | Published: November 14, 2015 12:40 AM2015-11-14T00:40:41+5:302015-11-14T00:53:29+5:30

मोबीन खान , वैजापूर ‘एक लाख लगाओ और चालीस दिन में एक करोड लेकर जाओ’ हे ऐकून कोणाच्याही तोंडाला लालसेचा पाझर फुटणारच. गेल्या १५ दिवसांपासून वैजापूर शहरात

Vaijapurat 'one to one hundred' | वैजापुरात ‘एक का सौ’

वैजापुरात ‘एक का सौ’

googlenewsNext


मोबीन खान , वैजापूर
‘एक लाख लगाओ और चालीस दिन में एक करोड लेकर जाओ’ हे ऐकून कोणाच्याही तोंडाला लालसेचा पाझर फुटणारच. गेल्या १५ दिवसांपासून वैजापूर शहरात एका भोंदूबाबाने आपल्या या अनोख्या फंद्यात करोडो रुपयांचा चुना वैजापूरकरांना लावला आहे. विशेष म्हणजे इतकी मोठी फसवणूक झाल्यानंतरही कोणी पोलिसांकडे केवळ बदनामीमुळे तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने पोलिसांनाही या घटनेविषयी बघ्याची भूमिका पार पाडावी लागत आहे.
दररोज विविध वृत्तपत्रांत व टीव्हीवर चोरी व फसवणुकीच्या घटना आपण बघत आहोत. माहीत असतानाही झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अशा सूचनांकडे माणूस दुर्लक्ष करतो अन् याच गोष्टीचा काही ठकबाज फायदा उचलतात. गेल्या पंधरा दिवसांपासून वैजापूर शहरातही असाच फसवणुकीचा खेळ जोरात सुरू आहे.
नाशिक येथील एका भोंदू बाबाने वैजापूर येथील काही पंटरांना हाताशी धरून पैशांचा पाऊस पाडण्याचा धंदा सुरू केला आहे. ‘एक लाख लगाओंगे तो एक करोड मिलेंगा’ असा हा फंडा असून यासाठी काही नियम व अटी भोंदू बाबाने ठेवलेल्या आहेत. पैसे दहापट पाहिजे तर त्यासाठी पाच व्यक्तींनी प्रत्येकी एक लाख याप्रमाणे पाच लाख रुपये बाबाकडे जमा करावे लागतील. एक लाख नसेल तर दहा व्यक्तींनी प्रत्येकी ५० हजार प्रमाणे पाच लाख बाबाकडे जमा करावेत. पैसे जमा केल्यानंतर म्हणेल त्या ठिकाणी त्या पैशावर बाबा विधी करून चाळीस दिवसांत पाच करोड देण्याची बोळवण करीत आहे.
जर कोणी शंका उपस्थित केली तर पैसे घेऊन माझ्यासोबत उज्जैनला जाऊन विधीसाठी साहित्य खरेदी करण्याची अट घालत आहे. विशेष म्हणजे या कामात स्थानिक पंटरांचा मोठा हस्तक्षेप असल्यामुळे अनेक लोक फसले जात आहेत. मिळालेल्या सूत्रानुसार १५ दिवसांत या भोंदूबाबाने करोडो रुपये या लोकांकडून उकळले आहेत.
आपण फसल्याचे कळून चुकल्यानंतरही केवळ बदनामीच्या धाकाने कोणी पोलिसांकडे तक्रार करण्यास धजावत नसल्याने पोलिसांनाही माहिती असतानाही बघ्याची भूमिका घ्यावी लागत आहे.

Web Title: Vaijapurat 'one to one hundred'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.