वैजापुरात सेनेचे मार्गदर्शन शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:02 AM2018-07-22T00:02:22+5:302018-07-22T00:02:43+5:30

आर. एम. वाणी यांची घोषणा : रमेश बोरनारे आमदारकीचे उमेदवार

 Vaijapuret Army Senna's guidance camp | वैजापुरात सेनेचे मार्गदर्शन शिबीर

वैजापुरात सेनेचे मार्गदर्शन शिबीर

googlenewsNext

वैजापूर : येथील शिवसेनेच्या मार्गदर्शन शिबिरात येत्या विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघात सेनेकडून आमदारकीचे उमेदवार जि.प. सदस्य रमेश बोरनारे हे राहतील, असे माजी आमदार आर.एम. वाणी यांंनी जाहीर केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. खा. चंद्रकांत खैरे व उपनेते विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत शनिवारी येथे झालेल्या बैठकीत वाणी यांनी हे वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली.
आपण विधानसभेची निवडणूक लढविणार नसल्याचेही वाणी यांनी सांगितले. खा. खैरे यांच्यासह इतर वक्त्यांनीही हाच धागा पकडून भाष्य केले. मात्र उमेदवार ठरविण्याचा अधिकार आपल्याला नसून याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच निर्णय होईल, असे सांगत खैरे व संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी वाणींच्या विधानाला छेद दिला. यावर शिबिरात कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली होती. बोरनारे यांच्या नावाचे टाळ्यांच्या कडकडात स्वागत करण्यात आले व यानंतर काही वेळातच बोरनारे यांच्या उमेदवारीचा मॅसेज सोशल मिडियावरुन व्हायरल झाला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तालुक्यात भगवा फडकवणारच असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी शिबिरात व्यक्त केला.
वैजापूर व गंगापूर मतदारसंघातील शाखाप्रमुख, गटप्रमुख व शिवसैनिकांचे ‘भगवा फडकवणारच’ हे मार्गदर्शन शिबीर शनिवारी गंगापूर रस्त्यावर साई लॉन्समध्ये आयोजित करण्यात आले होते. वाणी हे माजी आमदार असून त्यांच्याकडे पक्षाचे कुठलेही पद नाही. त्यांचा सल्ला मात्र विचारात घेतला जाऊ शकतो. वैजापूर मतदारसंघात वाणी हेच उमेदवार असावेत, असे अनेकांचे मत आहे. तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपचे शिवसेनेला तगडे आव्हान आहे.
शिबिराला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, जि.प. सदस्य अविनाश गलांडे, संजय निकम, उपजिल्हा प्रमुख संतोष काळवणे, वैशाली पाटील, लता पागारे, रंजना कुलकर्णी, आनंदीबाई अन्नदाते, वर्षा जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. वाणी यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशान साधले. भाजपकडे आमदारकीसाठी वैजापुरात उमेदवार नाही. तरी त्यांचे नियोजन सुरु असल्याने सेनेने भाजपला गृहित धरु नये, असे घोसाळकर यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनीही मार्गदर्शन केले.

Web Title:  Vaijapuret Army Senna's guidance camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.