सुरांचा नजराणा अन् महिला कर्तृत्वाला सलाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:56 AM2018-03-06T00:56:27+5:302018-03-06T00:58:32+5:30

जागतिक महिला दिनानिमित्त लोकमत सखी मंचतर्फे सखींसाठी मनोरंजनासोबतच नवी उमेद देणा-या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंतचा ‘लाईव्ह शो’ आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणा-या स्त्री कर्तृत्वाचा सन्मान या स्वरूपाचा हा कार्यक्रम प्रत्येक सखीला महिला दिनाची एक अनोखी भेट देणारा ठरेल.

Vaishali Samant's live concert in Aurangabad on women's day | सुरांचा नजराणा अन् महिला कर्तृत्वाला सलाम !

सुरांचा नजराणा अन् महिला कर्तृत्वाला सलाम !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जागतिक महिला दिनानिमित्त लोकमत सखी मंचतर्फे सखींसाठी मनोरंजनासोबतच नवी उमेद देणा-या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंतचा ‘लाईव्ह शो’ आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणा-या स्त्री कर्तृत्वाचा सन्मान या स्वरूपाचा हा कार्यक्रम प्रत्येक सखीला महिला दिनाची एक अनोखी भेट देणारा ठरेल.
दि. ८ मार्च रोजी सायं. ५ वा. श्रीहरी पॅव्हेलियन, शहानूरमिया दर्गाजवळ, शहानूरवाडी येथे हा कार्यक्रम होणार आहे. भाग्य विजय, अभिनव इंटरनॅशनल स्कूल, फोनिक्स फॅशन डिझायनिंग स्कूल, सोनी मसाले हे कार्यक्रमाचे सहायक प्रायोजक आहेत.
वैशाली सामंतचा आवाज हीच तिची खरी ओळख आहे. ‘ऐका दाजिबा’फेम ही प्रगल्भ गायिका महिला दिनाच्या निमित्ताने खास सखींच्या भेटीला येत आहे. वैशालीच्या साथीने रंगणारा हा सुरांचा प्रवास अनेक लोकप्रिय नव्या-जुन्या, हिंदी-मराठी गीतांनी नटलेला आहे.
यासोबतच औरंगाबाद जिल्ह्याच्या कानाकोपºयातल्या ध्येयवेड्या सेवाव्रतींना या पुरस्कारामार्फ त मानाचा मुजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला येताना सखी मंचचे २०१८ चे ओळखपत्र सोबत आणावे. लहान मुलांना सोबत आणू नये.
खास तुमच्या आग्रहास्तव सखी मंच सदस्यता नोंदणीची तारीख वाढवून देण्यात आली आहे. तुम्ही दि. ८ मार्चपर्यंत तुमच्या जवळच्या विभाग प्रतिनिधीकडे किंवा रिगल लॉन, लोकमत भवन येथे सदस्यता नोंदणी करू शकता. कार्यक्रमस्थळीही दु. ३ ते ५ या वेळेत नावनोंदणी करता येईल.

Web Title: Vaishali Samant's live concert in Aurangabad on women's day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.